ETV Bharat / bharat

Cyclone Biparjoy : बिपरजॉय कच्छपासून 290 किमी दूर; जाणून घ्या अपडेट - Biparjoy Moved towards Gujarat

चक्रीवादळ बिपरजॉय आता गुजरातमधील कच्छपासून 290 किमी अंतरावर आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात बचावाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे नियंत्रण कक्ष 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत, सुमारे 50 हजार लोकांना किनारी भागातून सुरक्षित स्थळी तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 14, 2023, 7:01 PM IST

बिपरजॉय

अहमदाबाद : अरबी समुद्रातून निर्माण झालेले चक्रीवादळ 'बिपरजॉय' गुजरातमधील कच्छपासून केवळ 290 किमी अंतरावर आहे. चक्रीवादळामुळे समुद्राच्या प्रचंड लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हाय अलर्टवर आहे. आतापर्यंत 47,113 लोकांना किनारी भागातील गावांमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी सांगितले की, बचाव, वीज, रस्ता, मोबाईल टॉवर आदींबाबत कृती आराखडा तयार आहे.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे सुरु : आलोक पांडे यांनी सांगितले की, चक्रीवादळाचा प्रभाव द्वारका, खंभलिया आणि मांडवी येथे दिसू लागला आहे. गेल्या 24 तासात जोरदार वाऱ्यासह 90 मिमी पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जुनागडमधील 4,462, कच्छमधील 17,739, जामनगरमधील 8,542, पोरबंदरमधील 3,469, द्वारकामधील 4,863, मोरबीमधील 1,936 आणि राजकोटमधील 4,497 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

आठ जिल्ह्यांमध्ये NDRF-SDRF टीम तैनात : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपत्तीला तोंड देण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. राजकोटमध्ये राखीव असलेल्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या कच्छला पाठवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची टीम सध्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याबाबत आणि वादळाच्या काळात काय करावे आणि काय करू नये, याची माहिती देत ​​आहे. सध्या आठ जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या एकूण 18 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय गरज भासल्यास पंजाब आणि तामिळनाडूमधून आणखी टीम्स विमानाने पाठवल्या जातील.

  • #WATCH | Visuals from Jakhau Port in Bhuj, where a large number of boats have been parked as fishing has been suspended in the wake of #CycloneBiparjoy.

    Cyclone 'Biparjoy' is expected to cross near Gujarat's Jakhau Port by the evening of 15th June pic.twitter.com/KA7OKJE68O

    — ANI (@ANI) June 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संरक्षण मंत्री तिन्ही सेना प्रमुखांशी बोलले : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तीन सेना प्रमुखांशी बोलले आणि चक्रीवादळाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेतला.

मी तिन्ही सेना प्रमुखांशी बोललो आणि 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या संदर्भात सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला. चक्रीवादळामुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला किंवा आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी सशस्त्र दल अधिकाऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. - राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

राज्याच्या किनारी भागात मुसळधार पाऊस : मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हा वादळाचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत बिपरजॉय गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गुजरातमध्ये अमरेली पोलिसांनी जाफ्राबादमधील सियालबेटमधील ग्रामस्थांना भाजीपाला आणि दुधासह जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या. भुजमधील जाखाऊ बंदरावर मोठ्या संख्येने मासेमारी नौका तैनात करण्यात आल्या आहेत. मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळून जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. cyclone Biparjoy: बिपोरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली, गेट वे परिसरात उसळल्या तुफान लाटा
  2. Cyclone Biparjoy Updates: गुजरातच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चक्रीवादळाचा वाढला धोका; सुरक्षेसाठी कांडला बंदरासह १९ रेल्वे बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.