बर्मिंगहॅम: भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 ) च्या अंतिम फेरीत पोहोतला आहे. त्याचबरोबर सोमवारी म्हणजेच आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांचा सामना होणार आहे. हा सामना जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असणार आहे.
आतापर्यंतच्या सहा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ( Indian Hockey Team ) सुवर्णपदक मिळालेले नाही. 1998 मध्ये या खेळांमध्ये हॉकीचा समावेश करण्यात आला होता, त्यानंतर 2010 आणि 2014 मध्ये भारताने रौप्य पदके जिंकली आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने सर्व सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळे त्यांचे वर्चस्व मोडून काढण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.
-
All eyes on GOLD today! 👀🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Catch the ACTION live today at 5:00 PM (IST) only on Sony TEN 3, Sony Six, and Sony LIV app.#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/GJfR5iv8hm
">All eyes on GOLD today! 👀🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 8, 2022
Catch the ACTION live today at 5:00 PM (IST) only on Sony TEN 3, Sony Six, and Sony LIV app.#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/GJfR5iv8hmAll eyes on GOLD today! 👀🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 8, 2022
Catch the ACTION live today at 5:00 PM (IST) only on Sony TEN 3, Sony Six, and Sony LIV app.#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/GJfR5iv8hm
भारताला आपले सर्वोत्तम देण्याची गरज -
ऑस्ट्रेलियाला ( Australia Hockey Team ) हरवून सुवर्ण विजेतेपद मिळवणे भारतासाठी सोपे नसेल आणि त्यासाठी त्यांना आपले सर्वोत्तम द्यावे लागेल. मात्र, 41 वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. भारताचे रौप्य निश्चित आहे, पण त्यांनी सुवर्ण मिळवायचे आहे. त्यामुळे मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ही संधी सोडू इच्छित नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेचा तर ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
भारतीय बचावफळी खूप मजबूत -
गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या ( Goalkeeper PR Sreejesh ) नेतृत्वाखाली भारतीय बचावफळी खूप मजबूत आहे, पण कोणतीही चूक ऑस्ट्रेलियाविरुद्ध महागात पडू शकते. मिडफिल्डमध्ये कर्णधार मनप्रीत, हार्दिक सिंग आणि नीलकांत शर्मा सांभाळतील. भारतीय फॉरवर्ड लाइनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंगसह समशेर सिंग, ललित उपाध्याय, गुरजंट सिंग आणि अभिषेक फॉर्मात आहेत. कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.