मुंबई - बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 11 हजार 179 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत. कालपेक्षा आज हे दर 17,043 रुपयांनी कमी झाले आहेत.
आजचा बिटकॉइन दर - आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 11 हजार 179 रुपये इतका आहे. कालपेक्षा आज हे दर 17,043 रुपयांनी कमी झाले आहेत. ( Bit Coin Rate )
आजचा इथेरिअम कॉईन दर - आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 40 हजार 284 रुपये इतका आहे. 498.99 रुपयांनी आज इथेरिअमचे दर कमी आहेत.
आजचा डॉज कॉईन दर - आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.71 रुपये इतका आहे.