मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात अब्जावधींचा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ८४ हजार २१५ रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार २४७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख ८४ हजार २१५ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०५० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ४६ हजार १४५ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.९१ रुपये इतका आहे.
हेही वाचा : पेट्रोल पुन्हा ११३ पार.. डिझेलची वाटचालही शंभरीच्या दिशेने.. पहा आजचे महाराष्ट्रातील दर