वॉशिंग्टन - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे, की क्रिप्टोकरन्सीचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाऊ शकतो, जो सर्व देशांसाठी क्रिप्टोशी संबंधित सर्वात मोठा धोका आहे. ( International Monetary Fund ) वॉशिंग्टन डीसी येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी अमेरिका दौऱ्यावर या गोष्टी सांगितल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर करूनच क्रिप्टोकरन्सीचे नियमन केले जाऊ शकतात. आणि कोणत्याही देशाला वाटत असेल की तो एकटाच हाताळू शकतो, तर ते शक्य नाही. सर्व देशांनी मिळून त्याचे नियमन करावे लागतील.
-
Union Finance Minister Smt. @nsitharaman and MD IMF Ms @KGeorgieva met during the Spring Meetings of IMF-WB, today, in Washington D.C. (1/7) pic.twitter.com/ZksWsqVelb
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Finance Minister Smt. @nsitharaman and MD IMF Ms @KGeorgieva met during the Spring Meetings of IMF-WB, today, in Washington D.C. (1/7) pic.twitter.com/ZksWsqVelb
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 19, 2022Union Finance Minister Smt. @nsitharaman and MD IMF Ms @KGeorgieva met during the Spring Meetings of IMF-WB, today, in Washington D.C. (1/7) pic.twitter.com/ZksWsqVelb
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 19, 2022
आम्ही क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर लावला - अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताने क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ते व्यवहार करणाऱ्या लोकांवर नजर ठेवता येईल. याद्वारे, त्यांच्या व्यवहारात कोण-कोण सामील आहे हे शोधणे शक्य होईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, "इलेक्ट्रॉनिक कोडमध्ये होत असलेल्या या व्यवहारांचा आम्ही कसा मागोवा घेऊ शकतो. त्यामुळे आम्हाला खात्री करायची होती. म्हणूनच आम्ही क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेच आम्ही हे करू शकू.
जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंगला उपस्थित राहणार - सीतारामन यांनी गेल्या दशकात भारताचे डिजिटायझेशन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, केंद्र सरकारचे प्रयत्न आणि कोरोना महामारीच्या काळात देशाने डिजिटल अवलंबनाच्या दरात कशी मोठी उपलब्धी मिळवली आहे हे देखील अधोरेखित केले आहे. अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जिथे त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंगला उपस्थित राहणार आहेत.
स्टॅनफोर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद - निर्मला सीतारामन (G20)अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरांच्या बैठकीतही सहभागी होतील. तसेच, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची भेट घेतील. सीतारामन सॅन फ्रान्सिस्कोमध्ये व्यावसायिक नेत्यांना भेटणार आहेत. दरम्यान, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवादही त्या साधणार आहेत.
हेही वाचा - Russia-Ukraine War : रक्तरंजित संघर्ष! रशिया-युक्रेन युध्द अधिक तीव्र; लिव्हमध्ये 7 ठार