नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये गुरुवारी सकाळी एका सीआरपीएफ जवानाने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, हा जवान नुकताच सुट्टीवरुन परत आला होता.
सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, अमर ज्योती आर. के. असे या जवानाचे नाव होते. ७९ बटालियनचा सदस्य असलेल्या या जवानाची मानसिक प्रकृती स्थिर नव्हती. आपल्या सहकाऱ्याच्या बंदुकीने आज स्वतःला गोळी मारुन घेत त्याने आत्महत्या केली.
"या जवानाचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याला कोणतेही शस्त्र देण्यात आले नव्हते. आज इतर जवान आपापल्या कामांमध्ये व्यग्र असताना त्याने दुसऱ्या एका जवानाची बंदुक घेत स्वतःला गोळी मारली. ५४ बटालियनच्या अरविंद कुमार या जवानाची ही बंदुक होती. अमर ज्योती हा नुकताच २७ दिवसांच्या सुट्टीवरुन परतला होता." अशी माहिती सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी वाय प्लस सुरक्षा