ETV Bharat / bharat

पती पत्नीचं भांडण ; दारूड्या पतीनं पत्नीचं तोडलं नाक, पत्नी पोलिसांना म्हणाली 'पतीचंही कापा नाक' - पती पत्नीचं भांडण

Husband Cuts Wife Nose : दारूड्या पतीनं पत्नीला मारहाण केल्यानंतर पत्नीचं नाक तोडल्यानं मोठी खळबळ उडाली. आता पतीचंही तसंच नाक कापण्याची मागणी पीडित पत्नीनं पोलिसांकडं केली आहे.

Crime News In Gonda
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 12:53 PM IST

Updated : Jan 7, 2024, 2:20 PM IST

लखनऊ Husband Cuts Wife Nose : पती पत्नीच्या भांडणात पतीनं पत्नीचं नाक तोडल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना गोंडा शहरातील कर्नलगंज परिसरात घडली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीनं पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत या सगळ्या प्रकरणाची आपबिती पोलीस अधीक्षकांना सांगतली, तेव्हा उपस्थित पोलीसही चक्रावून गेले. संजय असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे.

दारू पिऊन मारहाण करायचा पती : कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडितेचा पती संजय हा दारूडा आहे. तो दररोज दारू पिऊन पीडितेला मारहाण करायचा. पतीच्या दारूच्या व्यसनावरुन दोघा पती पत्नीत वाद होत होते. 4 जानेवारीला या पती संजय यानं पीडितेचं नाक तोडल्यानं गोंडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील पती दारू पिऊन त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. त्यावरुन या दोघा पती प्तनीत वाद व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

माहेरात राहणाऱ्या पत्नीला बोलावलं लेकरांसाठी : कर्नलगंज कोतवाली परिसरातील अतरसुईया गावात पीडिता राहते. पती मारहाण करत असल्यानं ही पीडिता तिच्या माहेरात राहत होती. "माझा पती संजय दारूडा आहे. तो मला रोज मारहाण करायचा. यावरून वाद सुरू आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या घरी राहत असून मला तीन मुलं आहेत. माझ्या पतीनं तिघांनाही त्याच्याडं ठेवलं आहे. 4 जानेवारीला माझ्या दारूड्या पतीनं मुलांना देण्यासाठी सासरी बोलावलं होतं. त्यामुळं मुलांना घ्यायला मी आली होती. मात्र पतीनं पुन्हा हाणामारी केली. मुलांना देण्यास नकार देत अचानक त्यानं माझं नाक दातानं चावलं. मी गंभीर जखमी झाले. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथं आले" असं पीडितेनं सांगितलं.

पतीचंही नाक कापा, पीडितेची मागणी : पीडितेनं सांगितलं की, "मी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. याप्रकरणी पती संजयविरुद्ध कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप माझी वैद्यकीय तपासणी पोलिसांनी केली नाही. माझ्या पतीला अटक झाली नाही." असंही या घटनेतील पीडितेनं माध्यमांना सांगितलं. पतीला अटक झाली नसल्यानं पीडिता आणि तिची आई पोलीस अधिकाऱ्यांकडं चकरा मारत आहेत. शनिवारी पीडिता पोलीस अधीक्षक कार्यालयात आली होती. पोलिसांनी या प्रकरणावर कारवाई करावी अशी मागणी तिनं केली. पीडितेनं "मुलं परत केली पाहिजेत. पोलिसांनी आरोपी पतीवर कठोर कारवाई करावी, माझ्यासोबत जे घडलं तेच त्याच्यासोबतही झालं पाहिजे. त्याचंही नाक कापलं पाहिजे" अशी मागणी केली. "या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नलगंज कोतवाली पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत" अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनय कुमार सिंह यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Army Jawan Wife Beaten By Men : पत्नीला अर्धनग्न करुन 120 नराधमांनी केली बेदम मारहाण; जवानाने व्हिडिओ शेअर करुन सांगितली आपबिती
  2. Thane Wife Broke Husband Head नवऱ्याचा मोबाइल हिसकावून डोक्यात घातला पाट; पत्नी विरुद्ध गुन्हा
  3. Wife Beaten Husband : पत्नीने पतीला बॅटने केली मारहाण; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...बापरे!

Last Updated : Jan 7, 2024, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.