लखनौ : आतिक व अश्रफची हत्या करणारा लवलेश तिवारी हा बांदा येथील आहे. तर अरुण मौर्य हा हमीरपूरचा रहिवासी आहे. तिसरा आरोपी सनी कासगंज जिल्ह्यातील आहे. अतिकची हत्या करण्यामागे तिघांनीही धक्कादायक कारण सांगितले आहे. तिन्ही शूटरला डॉन होण्याची इच्छा आहे. तिघांनीही आपापल्या कुटुंबांबरोबरील संबंध तोडले आहेत.
लवलेशला आहे अमली पदार्थांचे व्यसन अतीक आणि असद यांची हत्या करणारा गोळीबार करणारा लवलेश हा बांदा शहरातील कोतवाली क्योत्रा येथील राहणारा आहे. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, लवलेशचे कुटुंबासोबत कोणतेही नाते राहिले नव्हते. वडिलांनी सांगितले की लवलेश ४ भावांमध्ये तिसरा आहे. त्याला अमली पदार्थांचे व्यसनी आहे. अनेक गुन्हेगारी कृत्यामध्ये त्याचा सहभाग आहे. त्याने सांगितले की, लवलेश आठवडाभरापूर्वी घरी आला होता. त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही. शनिवारी रात्री जेव्हा अतीक अहमदची हत्या करण्यात आली, तेव्हा त्यांना धक्का बसला.
सनी सिंह हा घरातून पळून गेला होता- सनी हमीरपूरचा रहिवाशी आहे. अतीक अहमद आणि अश्रफ यांना गोळ्या घालणाऱ्या दुसऱ्या शूटरचे नाव सनी सिंग असून तो हमीरपूरचा रहिवासी आहे. शूटर सनीचा भाऊ पिंटू सिंहने सांगितले की, सनी कोणतेच काम करत नव्हता. त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. सनीला ३ भाऊ होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. गेली अनेक वर्षे सनी मोकाटपणे फिरून फालतू गोष्टी करत असे. सनीचे भाऊ त्याच्यापासून वेगळे राहतात. तो लहानपणी घरातून पळून गेला होता.
अरुण मौर्याने पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती: तिसरा आरोपी अरुण मौर्या हा कासगंजमधील सोरॉन पोलिस स्टेशन हद्दीतील बघेला पुख्ता गावात राहणारा आहे. अरुणच्या वडिलांचे नाव हिरालाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण उर्फ कालिया हा गेल्या 6 वर्षांपासून घराबाहेर राहत होता. जीआरपी स्टेशनच्या एका पोलिसाची हत्या करून तो फरार झाला होता. अरुणच्या आई-वडिलांचा १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तुरुंगातच तिन्ही हल्लेखोरांची मैत्री झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले.
मोठा डॉन होण्याची तिघांची होती इच्छा- अतिक आणि अशरफची हत्या करून तिघांनाही डॉन होण्याची इच्छा होती. छोट्या गुन्ह्यासाठी तुरुंगात जाऊन आपले नाव कमावले जात नाही. त्यामुळे काहीतरी मोठा गुन्हा करण्याचा त्यांचा विचार होता. यादरम्यान अतिक आणि अश्रफ यांना मारण्याचा त्यांनी डाव रचला. अतिकला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात नेण्यात येत असल्याच्या घटनास्थळी पोहोचले. तिघांनीही मोठे नाव कमावण्याच्या उद्देशाने हत्येचा कट रचला. शुक्रवारी हल्ल्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर रेकी केली होती. यानंतर शनिवारी तिघांनीही पत्रकार असल्याचे भासवित अतिक आणि अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या केली.