ETV Bharat / bharat

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील 'विरोधकांच्या बैठकी'ला तडा? - Aam Aadmi Party

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आज विरोधकांची बैठक बोलावली आहे. अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेऊन राष्ट्रपती निवडणुकीवर त्या चर्चा करतील. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याचा यातून प्रयत्न होईल. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) या बैठकीमध्ये उमेदवारासाठी सहमती करता प्रतिनिधी पाठवण्याची शक्यता नाही. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीही या बैठकीत सहभागी होत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील 'विरोधकांच्या बैठकी'ला तडा?

author img

By

Published : Jun 15, 2022, 11:12 AM IST

Updated : Jun 15, 2022, 1:18 PM IST

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेस (TMC) च्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आज विरोधकांची बैठक बोलावली आहे. अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेऊन राष्ट्रपती निवडणुकीवर त्या चर्चा करतील. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याचा यातून प्रयत्न होईल.

टीआरएस सहभागी होण्याची शक्यता कमी - मात्र CMO सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) या बैठकीमध्ये उमेदवारासाठी सहमती करता प्रतिनिधी पाठवण्याची शक्यता नाही. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीही या बैठकीत सहभागी होत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतरच 'आप' या मुद्द्यावर विचार करेल, असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले. एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी या बैठकीला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसला आपला विरोध आहे. त्यामुळे त्यांना बोलावले असल्याने आपणाला जरी बोलावले असते तरी आपण गेलो नसतो असे एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले.

कोण-कोण राहणार उपस्थित - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी राजधानी दिल्लीत आहेत. बैठकीपूर्वी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होणार असून २१ जुलैला निकाल जाहीर होणार आहेत. या बैठकीत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा आणि जनता दल (एस) नेते एचडी कुमारस्वामी, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती भाग घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसला बरोबर घेऊनच विरोधकांची एकी साधली जाईल असे म्हटले आहे.

  • On being asked about Opposition parties' meet today, Congress leader Mallikarjun Kharge said, "MK Stalin (TN CM), K Chandrashekar Rao (Telangana CM), Uddhav Thackeray (Maharashtra CM) & many big leaders aren't participating...we want unity & a unanimous (Presidential) candidate." pic.twitter.com/xAupZ93aLc

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एमके स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघमचे (डीएमके) प्रतिनिधित्व टीआर बालू करतील तर शिवसेनेचे सुभाष देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीत काँग्रेसही सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

डावेही होणार सहभागी - बॅनर्जी यांनी भाजपचा माजी सहयोगी शिरोमणी अकाली दलालाही निमंत्रण पाठवले आहे पण ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी मंगळवारी सांगितले की, डावे पक्ष या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सीपीआय-एम आणि इतर डावे पक्ष बंगालमधील सत्ताधारी टीएमसीचे प्रतिस्पर्धी आहेत.

नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, ज्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. बॅनर्जी यांनी यापूर्वी डावे पक्ष, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह २२ नेत्यांना पत्र लिहिले होते.

Last Updated : Jun 15, 2022, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.