ETV Bharat / bharat

कर्नाटकात १८ जानेवारीपासून लागू होणार गोवंश हत्या बंदी कायदा

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशप्रमाणे आता कर्नाटकमध्येही गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला जाणार आहे. येत्या १८ जानेवारीपासून राज्यात गोवंश हत्या करणे कायद्याने गुन्हा ठरेल.

author img

By

Published : Jan 17, 2021, 7:53 AM IST

Prabhu Chauhan
प्रभू चौहान

बंगळुरू - कर्नाटकमध्ये येत्या १८ जानेवारीपासून गोवंश हत्या बंदी कायदा अमलात आणला जाणार आहे. मंत्री प्रभू चौहान यांनी याबाबत माहिती दिली. संपूर्ण राज्यात हा कायदा लागू केला जाणार असून कायद्यातील नियमावली पूर्णत्त्वास आली आहे. लवकरच ही नियमावली जाहीर केली जाईल, असेही चौहान यांनी सांगितले.

लवकरच प्राण्यांच्या वाहतुकीबाबतचे नियमही तयारकरून जाहीर केले जातील. एका पत्रकाच्या माध्यमातून मंत्री चौहान यांनी शेतकऱयांना आवाहन केले आहे. शेती व पशुपालनासाठी प्राण्यांची वाहतूक करणे आणि कत्तलीसाठी वाहतूक करणे या नियमांमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ करू नये, असे ते म्हणाले.

राज्यातील पोलीस दल हे सामाजिक संस्था आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. हे तीनही घटक गोवंश हत्या टाळण्यासाठी एकत्र काम करतील. पोलीस दल आणि पशुपालन विभाग राज्यातील गायींच्या अवैध वाहतुकीवर आणि हत्येवर काटेकोरपणे लक्ष ठेवतील, असेही चौहान यांनी सांगितले.

जर नागरिकांना गायींच्या अवैध वाहतुकीबाबत किंवा हत्येबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात याची माहिती द्यावी. नागरिकांनी भावनेच्या भरात कायदा हाती घेऊ नये, असे आवाहनही प्रभू चौहान यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.