नवी दिल्ली : एक मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही नोंदणी सरकारच्या कोविन पोर्टलवर करता येईल. (cowin.gov.in) मंत्रालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली. मंत्रालयाने एक पोस्टर ट्विट केले आहे. यामध्ये "मी १८ वर्षांचा आहे.. म्हणजेच मी आता लस घेऊ शकतो." अशा आशयाचे हे पोस्टर आहे.
देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची घोषणा केली होती. या टप्प्यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही राज्यांनी हे लसीकरण मोफत होणार असल्याची घोषणाही केली आहे.
हेही वाचा : उत्तराखंडमधील नर्सिंग कॉलेजचे ९३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!