नवी दिल्ली: देशभरातील काही राज्यांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (UTs) आपत्कालीन हॉटस्पॉट ओळखण्यास सांगितले. त्यांनी चाचणी, लसीकरण वाढवण्यास आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची तयारी सुनिश्चित करण्यास सांगितले.
राज्यांना सतर्कतेचा सूचना: कोविड-19 बाबत राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठकीची अध्यक्षता करताना मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी सर्व तयारी ठेवण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या तीन बिगर भाजपशासित राज्यांचे आरोग्य मंत्री या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ज्या राज्याच्या आरोग्य मंत्री आहेत, राजस्थानचे आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा आणि केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
तयारीचा आढावा : बैठकीदरम्यान मांडविया यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांसह तयारीचा आढावा घेण्यास सांगितले. राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले होते. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनाही या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयांना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद : मांडविया म्हणाले की, 'केंद्र आणि राज्यांनी कोविड-19 ची प्रकरणे वाढली तेव्हा पूर्वीप्रमाणेच सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे.' मांडविया यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक झाली.
या मंत्र्यांचा सहभाग: आढावा बैठकीत एन. रंगास्वामी, मुख्यमंत्री, पुद्दुचेरी, धनसिंग रावत, आरोग्य मंत्री (उत्तराखंड), केशव महंत, आरोग्य मंत्री (आसाम), विश्वजित राणे, आरोग्य मंत्री (गोवा), बन्ना गुप्ता, आरोग्य मंत्री मंत्री (झारखंड), प्रभुराम चौधरी, आरोग्य मंत्री (मध्य प्रदेश), बलबीर सिंग, आरोग्य मंत्री (पंजाब), डॉ. सपन रंजन सिंग, आरोग्य मंत्री (मणिपूर).
हेही वाचा: आता हिंदुराष्ट्र नको, थेट शंकराचार्यांनीच सांगितलं