ETV Bharat / bharat

कोविड -19: देशभरातील परिस्थितीचा घेतलेला आढावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाव्हायरसमुळे संपुर्ण देश चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अ‌ॅण्ड रिसर्च सेंटरने सोमवारी कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याची सुरूवात केली आहे.

कोविड -19: देशभरातील बातम्या
कोविड -19: देशभरातील बातम्या
author img

By

Published : Dec 8, 2020, 12:29 AM IST

हैदराबाद - एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अ‌ॅण्ड रिसर्च सेंटरने सोमवारी भारत बायोटेक द्वारा विकसित कोव्हॅक्सिन मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली. तिसऱ्या टप्प्यात ही लस सुमारे 1000-1500 स्वयंसेवकांना दिली जाईल, असे एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

पहिल्या टप्प्यात 30 स्वयंसेवकांवर लसीची तपासणी करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यात 150 हून अधिक जणांवर त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, कोरोनाची जरी लस येत असली तरी संसर्गापासून बचाव होईपर्यंत कुठलाही हलगर्जीपणा होऊ नये. कोरोना लसीसाठी देशाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

कोविड -19
कोविड -19

दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आढावा-

एलजी अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत कोविड -19 लसीकरणाच्या सज्जतेचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य सचिव आरोग्य विभाग आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अतिरिक्त संचालक प्रकाश के. सिंह उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत एका दिवसात 1,674 कोरोनाबाधीत आढळून आले. तसेच सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह दर 3.15 टक्क्यांवर घसरला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा-

राज्यातील सरकारी शाळांमधील तब्बल 2800 अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आरटी-पीसीआर चाचणीत हे सर्व कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे. सर्वात जास्त कोरोना पॉझिटीव्ह शिक्षक चंद्रपुरात आढळले आहेत. 265 शिक्षक आणि 115 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

गुजरातमधील कोरोना परिस्थितीचा आढावा-

गुजरातमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अहमदाबादमधील नाईट कर्फ्यू पुढील नोटीसपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अहमदाबादमध्ये 306 नवीन बाधीत आढळले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात 23 नोव्हेंबर रोजी रात्रीचे कर्फ्यू लागू करण्यात आले. त्यानंतर 7 डिसेंबरपर्यंत कर्फ्यू वाढविण्यात आला. दरम्यान, शहर पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी पुढील आदेश येईपर्यंत रात्रीची कर्फ्यू वाढवण्याची घोषणा केली. या संदर्भातील पुढील आदेश येईपर्यंत 7 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 या दरम्यान कर्फ्यू असेल, असे आदेशात म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील कोरोना परिस्थितीचा आढावा-

ग्वाल्हेर- मास्क न घालणे, कोरोनाच्या नियमांचे पालन करणाऱ्यांना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये अनोखी शिक्षा ठेवण्यात आली. स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे की, फेस मास्कशिवाय पकडलेल्या लोकांना तुरूंगात टाकले जाईल. तेथे त्यांना शिक्षा म्हणून कोरोनाव्हायरसवर निबंध लिहावा लागेल. रोको-टोको मोहिमेअंतर्गत ही अनोखी शिक्षा दिली जाईल.

हेही वाचा- राज्यात ३ हजार ७५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ४० रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा- 'भारत बंद'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा; कृषी आयोग लागू करण्याची अण्णांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.