हैदराबाद - भारतात मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 91 लाख 77 हजार 841 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 34 हजार 218 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील 86 लाख 4 हजार 955 रुग्ण आतापर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथे कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
राज्यात मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत 5 हजार 439 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 लाख 89 हजार 800 वर पोहोचला आहे. राज्यात मंगळवारी 30 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 46 हजार 683 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के इतका आहे. राज्यात मंगळवारपर्यंत एकूण 83 हजार 221 सक्रिय रुग्ण आहेत.
नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत 6 हजार 224 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. दिल्लीतील एकूण बाधितांचा आकडा 5 लाख 40 हजार 541 झाली आहे. मंगळवारी 109 रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली असून मंगळवारपर्यंत एकूण 8 हजार 621 मृत्यूंची नोंद झाली आहे.
कर्नाटक
केंद्राच्या निर्देशानंतर कर्नाटकने कोरोना लसीच्या वितरणासाठी प्रशासनास आवश्यक पाऊले उचलायला सांगितले. आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी मंगळवारी राज्याच्या कोरोना टास्क फोर्सशी या मुद्द्यावर चर्चा केली. लस वितरणासाठी सुरू केल्या गेलेल्या उपायांवर बोलताना ते म्हणाले, सरकारने लसीकरण कार्यक्रमाच्या मापदंडानुसार 29 हजार 451 लसीकरण केंद्र व 10 हजार 8 लसीकरण देणाऱ्या स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे.
तेलंगणा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) म्हणाले, जेव्हा कोरोना लसीला मंजूरी मिळाल्यानंतर तत्काळ लसीकरणाची घोषणा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत लसीकरणाचे परिणाम जाणून घेण्यासाठी काही लस राज्यांत पाठवून द्यावी, अशी विनंती त्यांनी मोदी यांना केली आहे.
हेही वाचा - CORONA पंतप्रधान मोदींची आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा.. लसीबाबत केलं मोठं विधान