नवी दिल्ली Covid 19 New Varient : राजधानी दिल्लीत कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराचं पहिला रुग्ण मिळाल्याचं समोर आलंय. तपासणीसाठी पाठवलेल्या तीन नमुन्यांपैकी एका रुग्णामध्ये JN.1 आणि इतर दोन नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आलाय. JN.1 हे ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहे आणि हा एक सौम्य संसर्ग आहे. तो दक्षिण भारतात पसरत आहे. याला घाबरण्याची गरज नसल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले.
दिल्लीत RTPCR चाचण्या सुरु : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवण्यासाठी दिल्लीत RTPCR चाचणी सुरु करण्यात आलीय. दिल्लीचे आरोग्यमंत्री भारद्वाज म्हणाले की, ''दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये दररोज 250 ते 400 आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. काल झालेल्या सर्व चाचण्यांपैकी कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या रुग्णालयात चार-पाच कोरोना रुग्ण दाखल आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं वृत्त नाही."
-
#WATCH दिल्ली: कोविड स्थिति पर दिल्ली के स्वास्थ्य मंत्री और AAP नेता सौरभ भारद्वाज ने कहा, "दिल्ली में हमने RTPCR टेस्टिंग शुरू कर दी है और रोज लगभग 250 से 400 तक RTPCR टेस्ट हो रहे हैं। कल की रिपोर्ट में 2 पॉजिटिव मामले सामने आए। कुल 4-5 मरीज अस्पताल में भर्ती हैं। किसी की… pic.twitter.com/CR68Ip3yst
— ANI_HindiNews (@AHindinews) December 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH दिल्ली: कोविड स्थिति पर दिल्ली के स्वास्थ्य मंत्री और AAP नेता सौरभ भारद्वाज ने कहा, "दिल्ली में हमने RTPCR टेस्टिंग शुरू कर दी है और रोज लगभग 250 से 400 तक RTPCR टेस्ट हो रहे हैं। कल की रिपोर्ट में 2 पॉजिटिव मामले सामने आए। कुल 4-5 मरीज अस्पताल में भर्ती हैं। किसी की… pic.twitter.com/CR68Ip3yst
— ANI_HindiNews (@AHindinews) December 27, 2023#WATCH दिल्ली: कोविड स्थिति पर दिल्ली के स्वास्थ्य मंत्री और AAP नेता सौरभ भारद्वाज ने कहा, "दिल्ली में हमने RTPCR टेस्टिंग शुरू कर दी है और रोज लगभग 250 से 400 तक RTPCR टेस्ट हो रहे हैं। कल की रिपोर्ट में 2 पॉजिटिव मामले सामने आए। कुल 4-5 मरीज अस्पताल में भर्ती हैं। किसी की… pic.twitter.com/CR68Ip3yst
— ANI_HindiNews (@AHindinews) December 27, 2023
अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण : देशातील केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाचा एक नवीन प्रकारही आढळून आलाय. त्यामुळं तिथं खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयं कोरोनाबाबत सतर्क आहेत. दिल्लीतील 100 हून अधिक खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी सरकारनं 6,157 खाटा राखीव ठेवल्या आहेत.
-
JN.1 is a sub-variant of Omicron and is a mild infection. This is the one spreading in south India. There is no need to panic. It causes mild sickness: Delhi Health Minister Saurabh Bhardwaj
— ANI (@ANI) December 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File pic) https://t.co/t1TbmlY8iA pic.twitter.com/PzujxS7tjF
">JN.1 is a sub-variant of Omicron and is a mild infection. This is the one spreading in south India. There is no need to panic. It causes mild sickness: Delhi Health Minister Saurabh Bhardwaj
— ANI (@ANI) December 27, 2023
(File pic) https://t.co/t1TbmlY8iA pic.twitter.com/PzujxS7tjFJN.1 is a sub-variant of Omicron and is a mild infection. This is the one spreading in south India. There is no need to panic. It causes mild sickness: Delhi Health Minister Saurabh Bhardwaj
— ANI (@ANI) December 27, 2023
(File pic) https://t.co/t1TbmlY8iA pic.twitter.com/PzujxS7tjF
महाराष्ट्रात नवीन 87 कोरोना रुग्ण : महाराष्ट्रात बुधवारी 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीय. तर, JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहचलीय. बुधवारी दिवसभरात राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 14 कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिलीय. यात मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक 19 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीय.
भारतात JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ : भारतातील कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची 22 रुग्ण आढळली होती, त्यांची संख्या आता 110 वर पोहचलीय. कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. पण सध्या गुजरात आणि कर्नाटकात याचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.
हेही वाचा :