ETV Bharat / bharat

आश्चर्यकारक ! लग्नामध्ये भेट दिला चक्क कांदा, पेट्रोल अन् एलपीजीचा सिलेंडर

चैन्नई - देशातील वाढत्या कांदा आणि इंधनच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. या दरवाढीचा एक प्रकारे निषेध नोंदवत चैन्नईमध्ये नवविवाहित जोडप्याला मित्रपरिवाराने भेट म्हणून पाच लिटर पेट्रोल, कांद्याची माला आणि एलपीजीचा सिलेंडर दिला आहे. हे पाहुन लग्न मंडपात आनंदाचे वातावरण पसरले. समोर असलेल्या लोकांना हसू आवरत नव्हते. तथापि, तामिळनाडूमध्ये एका लिटर पेट्रोलची किंमत 92 रुपये आणि एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर 900 रुपये आहे.

चैन्नई
चैन्नई
author img

By

Published : Feb 18, 2021, 3:43 PM IST

चैन्नई - देशातील वाढत्या कांदा आणि इंधनच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. या दरवाढीचा एक प्रकारे निषेध नोंदवत चैन्नईमध्ये नवविवाहित जोडप्याला मित्रपरिवाराने भेट म्हणून पाच लिटर पेट्रोल, कांद्याची माला आणि एलपीजीचा सिलेंडर दिला आहे. हे पाहुन लग्न मंडपात आनंदाचे वातावरण पसरले. समोर असलेल्या लोकांना हसू आवरत नव्हते. तथापि, तामिळनाडूमध्ये एका लिटर पेट्रोलची किंमत 92 रुपये आणि एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर 900 रुपये आहे.

लग्नामध्ये भेट दिला चक्क कांदा, पेट्रोल अन् एलपीजीचा सिलेंडर

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात इंधनाचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तूंच्या दरावर होत असून त्यामुळे महागाई वाढत आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक दर परभणीमध्ये आहे. येथे पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पावर पेट्रोल 101.86 वर पोहोचले आहे.

जानेवारीत महागाईचे प्रमाण -

किरकोळ बाजारपेठेत महागाईचा दर घसरून जानेवारीत ४.६ टक्के झाला आहे. पालेभाज्यांचे दर घसरल्याने महागाईचे प्रमाण कमी झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. डिसेंबर २०२० मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे प्रमाण हे ४.५९ टक्के होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.