ETV Bharat / bharat

Selfie : सेल्फी घेणे पडले महागात, जोडपं पडलं 120 फूट खोल खाणीत.. पुढे असे झाले.. - सेल्फी घेणे पडले महागात

मूळचा परावूर येथील रहिवासी असलेल्या विनू कृष्णन याने प्रसंगावधानाने वधूचे प्राण वाचवले. हा अपघात पाहणाऱ्या टॅपिंग मजुराने स्थानिकांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. (couple fall into 120 feet quarry). (couple fall while taking selfie).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 9, 2022, 8:14 PM IST

कोलम (केरळ) : केरळच्या कोलम येथे एक जोडपं ग्रेनाईट खाणीत सेल्फी घेण्याचा प्रयत्नात पाण्यात पडल्याची घटना घडली आहे. (couple fall while taking selfie). वधू सँड्रा एस कुमार सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्नात घसरली, तिला वाचवण्यासाठी वराने पाण्यात उडी मारली. कोलम जिल्ह्यातील कट्टुपुरम खाण येथे गुरुवारी ही घटना घडली. ही खाण सुमारे 120 फूट खोल आहे. (couple fall into 120 feet quarry).

वराने वेळीच वाचवले प्राण : मूळचा परावूर येथील रहिवासी असलेल्या विनू कृष्णन याने प्रसंगावधानाने वधूचे प्राण वाचवले. त्याने बुडणाऱ्या सँड्राला वेळीच पाण्यातून बाहेर काढून वाचवले. हा अपघात पाहणाऱ्या टॅपिंग मजुराने स्थानिकांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांनी खाणीत दोरी फेकून पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत दोघांना धरून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दोघांना किनाऱ्यावर आणण्यासाठी बोटीचा वापर केला गेला. दोघेही पडून जखमी झाले असून त्यांना कोल्लम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.