श्रीहरीकोटा - इस्त्रोने आज सकाळी आझादी सॅट ( EOS-02 and AzaadiSAT ) पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताचे हे पहिले स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल ( SSLV ) प्रक्षेपित करण्यात आले. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.18 मिनिटांनी या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली.
500 किमीपेक्षा कमी अंतर - पृथ्वीच्या 500 किमीपेक्षा कमी अंतराच्या कक्षेत राहील आणि 500 किलोपेक्षा कमी वजनाचा उपग्रह सोडण्याची ही मोहीम इस्त्रोने केली आहे. रविवारी इस्त्रोने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली.
हेही वाचा - Deepak Kesarkar : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा फॉर्म्युला का नाही-दीपक केसरकर