जिनिव्हा : पुढील महिन्यात कोरोनामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी होणार नाही, अशी आशा आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख असे म्हणाले ( Covid 19 end next month says who chief )आहेत. जिनिव्हा येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, डब्ल्यूएचओ कोरोना आपत्कालीन समिती पुढील महिन्यात कोरोना आणीबाणी समाप्तीची ( Corona Global health emergency ) घोषणा करेल.
कोरोना जागतिक आरोग्य आणीबाणी नाही : टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की आम्हाला आशा आहे की पुढच्या महिन्यात आम्ही असे म्हणू शकू की कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी ( Corona emergency will end next month ) नाही. कोविड 19 साथीच्या रोगासाठी जबाबदार SARS COV 2 विषाणू कधीही संपणार नाही. सर्व देशांनी इन्फ्लूएन्झा आणि आरएसव्ही सह इतर श्वसन रोगांसह त्याचे व्यवस्थापन करण्यास शिकले पाहिजे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले की, साथीच्या रोगाचा सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की सर्व देशांनी साथीच्या रोगांची तयारी, प्रतिबंध, शोध आणि जलद प्रतिसाद देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे आवश्यक ( India corona cases ) आहे.
संसर्ग आणि री-इन्फेक्शन चेतावणी : आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे स्पर्धेऐवजी सहकार्याची जास्त गरज आहे. ज्याने कोविड-19 ला जागतिक प्रतिसाद दिला. दरम्यान, डब्ल्यूएचओच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी जगभरात संसर्ग आणि पुन्हा संसर्ग होण्याचा इशारा दिला. डब्ल्यूएचओच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी चेतावणी दिली की SARS COV 2 विषाणू भविष्यात कसा विकसित होईल हे जगाला अजूनही माहित नाही आणि अशा अनिश्चिततेमुळे धोका आणखी वाढतो.