ETV Bharat / bharat

Twenty Thousand Corona Cases IN 24 Hours : देशात 24 तासात 20,044 कोरोना रुग्णांची नोंद, 56 जणांचा मृत्यू

देशामध्ये गेल्या 24 तासांत 20,044 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद झाली आहे. तर 56 कोरोना रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात 18,301 रुग्णांना घरी ( Corona patient discharges ) सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनावरील लस फार काळ त्यापासून संरक्षण करू शकत नाही असे एका अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. कालपासूनच (शुक्रवार) 75 दिवसांची बुस्टर डोसची देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.

corona update
corona update
author img

By

Published : Jul 16, 2022, 11:41 AM IST

मुंबई - गेल्या 24 तासांत 20,044 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद असून 56 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 18,301 रुग्णांना शनिवारी घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. दरम्यान, कोरोनावरील लस फार काळ त्यापासून संरक्षण करू शकत नाही असे एका अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. कालपासूनच (शुक्रवार) 75 दिवसांची बुस्टर डोसची देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. गेले दोन दिवस ४०० च्या खाली रुग्णसंख्या नोंद होत आहे. आज ३६५ रुग्णांची नोंद झाली आहे. २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २७० बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनावरील लस फार काळ त्यापासून संरक्षण करू शकत नाही असे एका अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. कालपासूनच (शुक्रवार) 75 दिवसांची बुस्टर डोसची देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.

कोरोना वाढीचा दर ०.०३५ टक्के - मुंबईत गेल्या २४ तासात ११ हजार ४४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३६५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.१९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ५२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २० हजार ५३७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९८ हजार २६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ६४० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १९७० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३५ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्या स्थिर - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.