ETV Bharat / bharat

Corona Cases in India : गेल्या 24 तासांत देशात 14 हजार 830 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 36 जणांचा मृत्यू - corona patients death india

गेल्या 24 तासांत देशात 14 हजार 830 नव्या कोरोना रुग्णांची ( Corona Cases in India ) नोंद झाली आहे. काल 16 हजावर रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले होते. त्या तुलनेत आज रुग्णांमध्ये घट ( Corona patients number india ) दिसून आली आही. तसेच, 36 जणांचा मृत्यू झाला असून 18 हजार 159 रुग्ण बरे झाले आहेत.

Corona Cases in India
कोरोना रुग्णसंख्या भारत
author img

By

Published : Jul 26, 2022, 10:34 AM IST

हैदराबाद - गेल्या 24 तासांत देशात 14 हजार 830 नव्या कोरोना रुग्णांची ( Corona Cases in India ) नोंद झाली आहे. काल 16 हजावर रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले होते. त्या तुलनेत आज रुग्णांमध्ये घट दिसून ( Corona patients number india ) आली आही. तसेच, 36 जणांचा मृत्यू झाला असून 18 हजार 159 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1 लाख 47 हजार 512 इतकी असून, पॉझिटिव्हिटी रेट 3.48 टक्के इतका आहे.

हेही वाचा - 22 Feared Death In Gujarat : दारुमुळे 22 जणांचा गुजरातमध्ये मृत्यू झाल्याची भीती

14 हजार 830 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या ही 4 कोटी 39 लाख 20 हजार 451 इतकी झाली आहे. एकूण मृत्यू 5 लाख 26 हजार 110 असून, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 50 हजार 877 वरून 1 लाख 47 हजार 512 वर घसरली आहे.

महाराष्ट्र रुग्णसंख्या - राज्यात सोमवारी 785 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. 6 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना रुग्णांची 82 लाख 35 हजार 46 इतकी झाली आहे. राज्याचा रिकवरी रेट 97.98 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत 937 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजार 534 इतकी आहे.

मुंबई रुग्णंख्या - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Corona Active Patients Mumbai ) रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. काल ( सोमवारी ) १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ( Corona 176 patients Mumbai ) 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या १६४ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.