पणजी - मुंबईहून 2 हजार पर्यटकांना घेऊन आलेल्या कार्डिलिया जहाजातील (Cardillia Cruise) क्रु मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने (Cordilla cruise crew Corona positive) या जहाजाला रविवारी उशिरा मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळेच जहाजातील सर्वाना सक्तीने चाचणी करायला लावण्यात आली. दरम्यान, या जाहाजावरील ६६ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.
मुरगाव बंदरात प्रवेश नाकारला -
जोपर्यंत सर्व प्रवाशांची चाचणी होत नाही तसेच अहवाल येत नाही तोपर्यंत या क्रूझला बंदरात क्रूझ टर्मिनलवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. जहाजातील एक क्रु मेंबर पॉझिटिव्ह (Cordilla cruise crew Corona positive) आढळल्याने या बंदराला प्रवेश नाकारण्यात आला होता. हे जहाज सध्या मुरगाव बंदरापासून खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे.
चाचणीनंतर पर्यटकांना मोकळीक - पेरनुलकर
जहाजातील सर्व पर्यटकांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पर्यटकांना मोकळीक देण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून हे जहाज खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले असल्याची माहिती आयोजक कंपनीचे सरव्यवस्थापक गोविंद पेरनुलकर यांनी दिली.
मुंबईतून शनिवारी निघालं होते जहाज -
हे जहाज मुंबईहून शनिवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन गोव्याकडे रवाना झाले होते. यात 1471 पर्यटक आणि 596 असे एकूण 2067 प्रवासी होते.
एका कर्मचाऱ्याला आला होता ताप -
एका कर्मचाऱ्याला दोन दिवसांपूर्वी ताप येत होता म्हणून त्याची चाचणी करण्यात आली होती, त्यांनतर त्याचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला.