बेतिया - पश्चिम चंपारणच्या बेतिया येथील राम लखन सिंह यादव महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. शिवशंकर कुमार आणि आदित्य कुमार अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
शिवशंकरने आपल्या उत्तरात बॉलिवूड अभिनेता सनी देओलला त्याचे वडील आणि नायिका प्रियांका चोप्राचे आई असे वर्णन केले आहे. त्यांनी या विषयावर काही लिखान केले असून काही प्रश्नांचे उत्तरात विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांनी रोल नंबरची जागा मात्र रिकामी ठेवली आहे.
या दोन मुलांपैकी एकाने इतिहासाशी संबंधित एका प्रश्नाचे विचित्र उत्तर दिले आहे. अकबराने जिझिया कर का काढला? या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थ्याने लिहिले की, 'रझियावरील प्रेमामुळे अकबरने जझिया कर हटवला.' पुढे एक प्रश्न होता की पुरातत्वशास्त्राने तुम्हाला काय शिकवले? उत्तरात त्यांनी लिहिले की, 'माझ्या शिक्षकांनी हा विषय शिकवला नाही. आम्हाला पुरातत्त्वशास्त्राचे काहीही समजत नाही. यासोबतच आणखी एक प्रश्न मोहेंजोदरोच्या स्नानगृहासंदर्भात होता. या प्रश्नाच्या उत्तरात शिवशंकरने लिहिले की 'राजाची पत्नी मोहेंजोदरोच्या विशाल स्नानगृहात आंघोळ करायची आणि कपडे घालायची. तसेच आदित्य कुमारचे उत्तरदेखील विचित्र होते.
आदित्य नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या प्रेमप्रकरणाचा देखील यात उल्लेख केला आहे. त्याने लिहीले की, 'माझ्या मैत्रिणीने माझी फसवणूक केली. ती एकाचवेळी पाच मुलांशी बोलते. मी माझी परिस्थिती सांगू शकत नाही. ती मुलगी खूप विश्वासघातकी निघाली. मी तिच्यावर खूप प्रेम करायचो, पण ती माझ्या प्रेमाची कदर करत नाही. आता ती खूप बदलली आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या दोन्ही उत्तरपत्रिकेच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.