ETV Bharat / bharat

कूच बिहार हिंसा : ममता दीदींनी साधला मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद, मदतीचे आश्वासन

author img

By

Published : Apr 11, 2021, 4:29 PM IST

कूच बिहारमध्ये झालेल्या गोळीबाराच चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हिडिओ कॉलवरून गोळीबारात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

सिलीगुडी (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये शनिवारी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यात कूच बिहारमध्ये झालेल्या गोळीबाराच चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हिडिओ कॉलवरून गोळीबारात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी सिलीगुडी येथे पत्रकार परिषद घेतली. तेव्हा व्हिडिओ कॉलिंगद्वारे मृतांच्या कुटुंबीयांशी त्या बोलल्या.

कूच बिहार हिंसेवर ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद

केंद्रीय सैन्यांचा वापर करून लोकांना ठार मारण्यात येत आहे. भाजपा नागरिकांची शुद्ध फसवणूक करत आहे. नरसंहार होत आहे. मी आता त्यांच्या कुटुंबीयांना भेटू शकले नाही. मी त्यांना 14 एप्रिलला भेटले. मला त्यांना भेटण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असे ममता म्हणाल्या. जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीआयएसएफ का तैनात केले गेले होते का, असा सवाल दीदींनी केला. वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे, असेही ममता म्हणाल्या.

मी निवडणूक आयोगाचा आदर करते. पण ते नियम बदलत आहेत. निवडणूक आयोगाची नाही. तर आता भाजपाची आचारसंहिता आहे. पक्षाच्या हितासाठी व्यवस्था बदलली जाऊ शकत नाही. संस्था आणि यंत्रणा कायम राहतील. निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि माध्यमे, या लोकशाही व्यवस्थेला मदत करणाऱ्या तीन महत्त्वाच्या संस्था आहे. पण या तिन्ही संस्था हळूहळू दुबळ्या होत असल्याचे दिसत आहे. किंबहुना यावर भाजपा नियंत्रण मिळवत आहे, असे दीदी म्हणाल्या.

दीदी काढणार होत्या निषेध मोर्चा -

गोळीबार घटनेविरोधात रविवारी कूचबिहार येथे निषेध मोर्चा काढून मृतांच्या घरी जाऊन भेट देणार असल्याचे दीदींनी शनिवारी म्हटले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कूचबिहार जिल्ह्यातील हद्दीत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला प्रवेश करू नये, असे निर्देश शनिवारी दिले. निवडणुकीच्या चौथ्या फेरीदरम्यान शनिवारी मतदान हिंसाचारात चार जण ठार झाले होते.

सीआयएसएफकडून गोळीबार -

जमावाने मतदान केंद्रावर हल्ला केल्यानंतर सीआयएसएफने गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रवरील मतदान प्रकिया थांबवण्यात आली. ही घटना सितालकुची विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 12 वर घडली आहे. याघटनेचा अहवाल निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन निरीक्षकांनी सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. कूचबिहारमध्ये जे घडले त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. नागरिक मतदान करत असताना सीआयएसएफने दोनदा गोळीबार केल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटलं आहे. यात टीएमसीच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा टीएमसीने केला आहे.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; शनिवार रात्रीपासून सुरुये चकमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.