ETV Bharat / bharat

conversion : पाचवेळा जिमला जायचा मुलगा, बापाने पाठलाग करताच समोर आला धर्मांतराचा सापळा

युपीमध्ये व्हिडिओ गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे रॅकेट उघडकीस आले. घटनेची माहिती होताच यूपी एटीएसची टीम गाझियाबादला तपासासाठी पोहोचली आहे. कशाप्रकारे व्हिडिओ गेमद्वारे धर्मांतरण केले जाते. याची माहिती युपी पोलिसांनी दिली आहे.

Conversion in up
ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतरण
author img

By

Published : Jun 7, 2023, 8:10 AM IST

लखनौ: तुमचे मुलं ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळतात का? हो, मग सावध व्हा कारण हे व्हिडिओ गेमच्या मदतीने तुमच्या मुलाचा धर्म बदलला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये असाच विचित्र प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांचे धर्म बदलण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे देशात खळबळ माजली आहे. गाझियाबाद पोलिसांनी व्हिडिओ गेमच्या माध्यामातून केल्या जाणाऱ्या धर्मांतरणचा पदार्फाश केला आहे.

पोलिसांनी केला खुलासा : या प्रकरणानंतर युपी एटीएस सक्रिय झाले आहे. एटीएसच्या डेप्टी एसपी रॅकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात एक पथक गाझियाबादकडे रवाना झाले आहे. जे गाझियाबाद पोलिसांना या प्रकरणाती तपासात सहकार्य करतील. गाझियाबाद पोलिसांनी ऑनलाइन गेम खरेदी करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे धर्मांतर कसे केले जाते याचा खुलासा केला होता.

अनेक राज्यामध्ये पसरले आहे धर्मांतराचे जाळे : यूपी एटीएस प्रमुख नवीन अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, गाझियाबाद पोलिसांनी उघड केलेले रॅकेटचे जाळ फक्त एका शहरात नाही तर ते इतर शहरातही पसरले आहे. याचप्रमाणे व्हिडिओ गेमच्या माध्यमातून धर्मांतरण केले जाण्याचे प्रकार फक्त यूपीमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही होत आहेत. या अशा गंभीर प्रकणाचा तपास करण्यासाठी आमची एक टीम गाझियाबादला पोहोचली आहे, जी या प्रकरणातील बारीक तपशील गोळा करत आहे. त्याचदरम्यान आणखी एका पथकने एटीएस मुख्यालयात अशा दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांचा अभ्यास केला जात आहे, कारण ते झाकीर नाईकच्या व्हिडिओ प्रसारित करत होती.

असा समोर आला धर्मांतरणाचा प्रकार : गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने आरोप केला होता की, त्यांचा मुलगा व्यायामासाठी जिममध्ये जाण्याच्या बहाण्याने पाच वेळा घराबाहेर जात होता. एकदा त्यांच्या वडिलांनी मुलाचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांचा मुलगा स्थानिक मशिदीत जाऊन तेथे नमाज अदा करतो. मुलाचे हे कृत्य पाहून वडिलांना धक्का बसला. वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा समोर आला. मुलाने मुंबईतील एका व्यक्तीकडून ऑनलाइन गेम विकत घेतले होते. एवढेच नाही तर गेम विकणारी व्यक्ती सतत मुलाच्या संपर्कात होती, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले. गेम विकत देणारी व्यक्ती मुलाला इस्लाम धर्माचे वैशिष्ट्य सांगत होते. याप्रकरणात पोलिसांनी अब्दुल रहमान आणि गाझियाबादच्या सेक्टर-23 येथील जामा मस्जिद कमिटीचे सदस्य शाहनवाज नावाच्या आरोपींना अटक केली. व्हिडिओ गेमद्वारे धर्मांतर करणाऱ्या टोळीच्या शोधात गाझियाबाद पोलीस महाराष्ट्रात छापे टाकत आहेत.

धर्मांतराचे आहे महाराष्ट्र कनेक्शन : या प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्रापासून चंदीगडपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत चार प्रकरणे समोर आले असून त्यापैकी दोन गाझियाबाद, एक फरिदाबाद आणि एक चंदिगडचे आहे. गाझियाबादमध्ये डीसीपी निपुण अग्रवाल यांनी गेमिंग अ‍ॅपद्वारे धर्मांतर केले जात असल्याचे सांगितले होते. लोकांना धर्मांतरासाठी यूट्यूब चॅनल दाखवण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी कविनगर पोलीस स्टेशनमध्ये आमिष दाखवून धर्मांतराची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणात सायबर शाखेने शाहनवाज खानला अटक केली आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. दरम्यान या प्रकरणात एका मौलवीचे नाव समोर आले आहे, तो गाझियाबादच्या सेक्टर 23 मध्ये काम करतो. अब्दुल असे या मौलानाचे नाव असून त्याने एका जैन आणि दोन हिंदू मुलांना फूस लावून त्यांचे धर्मांतर केले होते.

हेही वाचा -

  1. UP Crime News : आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवले, मग धर्मांतर करून केला विकण्याचा प्रयत्न ; पोलिसांकडून टोळीचा भंडाफोड
  2. Christian organization : जबरदस्तीने धर्मांतर आणि अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी ख्रिश्चन संघटनेवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.