रायचूर (कर्नाटक) - कर्नाटकात एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण फक्त 20 रुपयांच्या नोटेशी संबंधित आहे. प्रत्यक्षात २० रुपयांच्या फाटलेल्या नोटेवरून दोन महिलांमध्ये वाद झाला. यामध्ये दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात रुक्म्मा नावाची महिला गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रायचूरच्या स्थानिक गीता कॅम्पमध्ये मल्लम्मा नावाची महिला दुकान चालवते. रुकम्मा यांची मुलगी मल्लम्माच्या दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली होती. सामान घेतल्यानंतर रुकम्माच्या मुलीने तिला २० रुपयांची फाटलेली नोट द्यायला सुरुवात केली. तेव्हा मल्लम्माने त्यावर आक्षेप घेतला. त्याचवेळी रुकम्मा या दोघीही आल्या आणि त्यांनी फाटलेल्या नोटेवरून मल्लम्माशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, दुकानात ठेवलेले पेट्रोल दोघांच्या अंगावर पडले. त्याचवेळी जळता दिवा खाली पडला आणि त्यामुळे या दोघीही गंभीर जखमी झाल्या. तत्काळ दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान यापैकी रुक्म्मा यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मल्लम्मावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत सिंदनूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजू एकून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.