नवी दिल्ली : चित्रपटकार लीना मनिमेकलाई ( Leena Manimekalai ) यांच्या आगामी माहितीपट ‘काली’च्या ( Kaali ) पोस्टरच्या रिलीजवरून वाद सुरू झाला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा हवाला देत चित्रपट निर्मात्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोस्टर आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. हे पोस्टर ट्विट होताच व्हायरल झाले. लोक चित्रपट निर्मात्यावर आणि पोस्टरवर सतत टीका करत आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याबाबत गो महासभेचे अध्यक्ष अजय गौतम यांनी दिल्ली आयुक्त आणि गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे चित्रपट निर्मात्या लीना यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच पोस्टर्स आणि चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालावी अशी मागणीही केली आहे.
उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टरला विरोध होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये काली माँ सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. या संदर्भात लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यासह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टातही यासंदर्भात केस दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - The unique story of hero : चित्रपटाच्या निगेटिव्ह मधून नायक गायब होण्याची अनोखी कहाणी