ETV Bharat / bharat

Gulal From Flowers Controversy : 'हा सनातन धर्माचा अपमान', स्वागतासाठी वापरण्यात आलेल्या फुलांचा गुलाल बनवल्या वरून भाजपचा हल्लाबोल

author img

By

Published : Mar 1, 2023, 7:29 AM IST

रायपूर काँग्रेस अधिवेशनाशी संबंधित वाद सातत्याने वाढतो आहे. भाजपने प्रथम काँग्रेस अध्यक्ष आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटी प्रमुखांवर अपमान केल्याचा आरोप केला. आता या अधिवेशनातील आणखी एका प्रकरणावर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण प्रियांका गांधी यांच्या स्वागताशी संबंधित आहे.

Gulal From Flowers Controversy
स्वागतासाठी वापरण्यात आलेल्या फुलांचा गुलाल

भाजपचे नेते राजेश मुनत

रायपूर (छत्तीसगड) : ज्या दिवशी प्रियंका गांधी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रायपूरला आल्या होत्या, त्या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुलांची उधळण करण्यात आली होती. ती फुले आता गुलाल बनवण्यासाठी पाठवण्यात आली आहेत. त्यावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपने हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप : प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी रायपूरच्या रस्त्यांवर सुमारे 6 हजार किलो फुलांची उधळण करण्यात आली होती. ती फुले आता रायपूर जिल्हा पंचायतीच्या मल्टी युटिलिटी डोममध्ये पाठवण्यात आली आहेत. तेथे त्यापासून गुलाल बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र या फुलांपासून गुलाल बनवण्यास भाजपने विरोध केला आहे. भाजपचे माजी मंत्री आणि नेते राजेश मुनत यांनी या प्रकरणी निषेध नोंदवत आपला आक्षेप नोंदवला आहे. हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले राजेश मुनत? : राजेश मुनत म्हणाले की, 'काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी करोडो रुपये खर्च करून रस्त्यावर गुलाबाची फुले उधळण्यात आली. लोकांनी त्या फुलांना पायदळी तुडवले आणि त्यांच्यावरून वाहनेही गेली. मी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना विचारू इच्छितो की, तुम्हाला सनातन संस्कृतीही माहीत आहे का? पायदळी तुडवलेल्या गुलाबाच्या फुलांचा गुलाल करून आपण आपल्या देवी - देवतांना तो लावू शकतो का? जेव्हा आपण होलिकाची पूजा करतो त्यावेळी सर्वप्रथम आपण गुलाल वापरतो. मात्र जो गुलाब पायांनी तुडवला गेला आहे त्याचा गुलाल बनवून देवतांना अर्पण करणे म्हणजे सनातन धर्माचा अपमान नाही काय? मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचा विचार करून सनातन धर्माचा अपमान करणे थांबवावे'.

मुनत यांचे ट्विट : राजेश मुनत यांनी याबाबत ट्विटही केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पौराणिक काळापासूनच दिवसाची सुरुवात देवी - देवतांना अबीर गुलाल अर्पण करून केली जाते. होळीच्या शुभमुहूर्तावर काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्यावर उधळलेल्या आणि रस्त्यांवर तुडवलेल्या फुलांचा वापर गुलाल बनवण्यासाठी केल्याने सनातन धर्माचा अपमान होईल. या प्रकरणाने काँग्रेसची सनातनविरोधी मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

स्वागतासाठी 6 हजार किलो फुलांची उधळण : काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेरील 2 किलोमीटर रस्त्यावर सुमारे 6 हजार किलो गुलाबाची फुले अंथरली होती. यावेळी ढोल - ताशांच्या गजरात प्रियंका गांधी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मात्र, प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुले टाकल्याबद्दल काँग्रेस पक्षाला जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. त्याचवेळी आता या फुलांपासून गुलाल बनवण्यात येत असल्याने या बाबतीतही काँग्रेसला घेरल्याचे दिसते आहे.

हेही वाचा : Congress Plenary Session : प्रियंका गांधी काँग्रेस अधिवेशनात पोहोचल्या, स्वागताच्या वेळी गुलाबांची उधळण!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.