भोपाळ : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया (Raja Pateria) यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. पटेरिया यांचा एका मेळाव्याला संबोधित करतानाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत ते काँग्रेस कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींविरोधात भडकवताना दिसत आहेत. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (FIR on Raja Pateria). तर राजा पटेरिया यांनी याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. (Raja Pateria on PM Modi)
-
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को लेकर आपत्तिजनक बयान देने वाले कांग्रेस नेता राजा पटेरिया के खिलाफ पन्ना एसपी को तत्काल एफआईआर करने के निर्देश दिए गए है। pic.twitter.com/uTR2zBHjIP
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) December 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को लेकर आपत्तिजनक बयान देने वाले कांग्रेस नेता राजा पटेरिया के खिलाफ पन्ना एसपी को तत्काल एफआईआर करने के निर्देश दिए गए है। pic.twitter.com/uTR2zBHjIP
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) December 12, 2022माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को लेकर आपत्तिजनक बयान देने वाले कांग्रेस नेता राजा पटेरिया के खिलाफ पन्ना एसपी को तत्काल एफआईआर करने के निर्देश दिए गए है। pic.twitter.com/uTR2zBHjIP
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) December 12, 2022
काय म्हणाले राजा पटेरिया : व्हिडिओमध्ये राजा पटेरिया म्हणतात की, "पंतप्रधान मोदी जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. देशात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आहे. त्यामुळे जर तुम्हाला संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा". हा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राजा पटेरियाविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, या वक्तव्याबाबत माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे चुकीचे चित्रण केले जात आहे. मी असे काहीही बोललो नाही.
एफआयआर नोंदवण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश : मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पटेरिया यांचे हे विधान अत्यंत आक्षेपार्ह मानले आहे. नरोत्तम मिश्रा म्हणाले, "मी पोलिसांना राजा पटेरिया यांनी पंतप्रधानांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे आदेश देत आहे. सध्याची काँग्रेस महात्मा गांधींची कॉंग्रेस नसून इटालियन काँग्रेस आहे."
भाजपने व्यक्त केला आक्षेप : राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर भाजपनेही तीव्र आक्षेप घेतला आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हत्येबाबत अशा प्रकारे लोकांना भडकवणे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच राहुल गांधींच्या भारत छोडो यात्रेत असा कट रचला गेला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा : याप्रकरणी भाजप नेते राजपाल सिंह सिसोदिया यांनी एक ट्विट शेअर करत म्हटले की, "हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते राजा पटेरिया प्रक्षोभक भाषण देत समाजात फूट पाडत आहेत."
-
यह है @INCIndia का असली चेहरा पूर्व मंत्री व कांग्रेस नेता श्री राजा पटेरिया मोदी जी की हत्या का बयान देकर समाज को विभाजित कर भड़काऊ भाषण दे रहे है @BJP4India @BJP4MP @vdsharmabjp @HitanandSharma @LokendraParasar pic.twitter.com/XfJ0EApASx
— Rajpal Singh Sisodiya (@rpssisodiya) December 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">यह है @INCIndia का असली चेहरा पूर्व मंत्री व कांग्रेस नेता श्री राजा पटेरिया मोदी जी की हत्या का बयान देकर समाज को विभाजित कर भड़काऊ भाषण दे रहे है @BJP4India @BJP4MP @vdsharmabjp @HitanandSharma @LokendraParasar pic.twitter.com/XfJ0EApASx
— Rajpal Singh Sisodiya (@rpssisodiya) December 12, 2022यह है @INCIndia का असली चेहरा पूर्व मंत्री व कांग्रेस नेता श्री राजा पटेरिया मोदी जी की हत्या का बयान देकर समाज को विभाजित कर भड़काऊ भाषण दे रहे है @BJP4India @BJP4MP @vdsharmabjp @HitanandSharma @LokendraParasar pic.twitter.com/XfJ0EApASx
— Rajpal Singh Sisodiya (@rpssisodiya) December 12, 2022