हैदराबाद - पूजा चव्हाण आणि यात सरकारच्या एका मंत्र्याचे आलेले नाव, संबंधित मंत्र्याचा राजीनामा यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. देशात याआधीही अशी प्रकरणे झाली असून त्यात अडकलेल्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
अंजना शर्मा बलात्कार प्रकरण - जानेवारी 1999
जानकी बल्लभ पटनायक (तीन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री) यांना त्यांच्या कारकिर्दीत सर्वात मोठ्या वादाचा सामना करावा लागला. अंजना मिश्रा यांनी आरोप केला, की ती जात असलेल्या कारला तीन जणांनी अडवले आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात जे. बी. पटनायक यांचे निकटवर्तीय ओडिशातील माजी महाधिवक्ता इंद्रजित रे यांच्यावर आरोपी होता. ओरिसा हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश देईपर्यंत त्यांनी कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या घटनेनंतर ग्रॅहम स्टेनिजची हत्या करण्यात आली. त्यानंतर जे. बी. पटनायक यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा द्यावा लागला.
मधुमिता शुक्ला खून प्रकरण - मे 2003
मधुमिता शुक्ला या एक कवयित्री होती, जिच्याशी उत्तर प्रदेशचे एक मंत्री अमरमणी त्रिपाठी यांचे प्रेमसंबंध होते. या मधुमिताला दोघांनी गोळ्या घालून ठार केले. या घटनेनंतर त्रिपाठींना समाजवादी पार्टीने काढून टाकले होते. हत्येदरम्यान ती 7 महिन्यांची गर्भवती होती. तपासादरम्यान सीबीआयने मृत मधुमिताची एक डायरी जप्त केली होती, ज्याच्या आधारे संपूर्ण तपास सुरू होता. गर्भाच्या डीएनए चाचणीने अमरमणी त्या मुलाचे वडील असल्याचे स्पष्ट झाले होते. मधुमिताला ठार करण्यासाठी अमरमणींनी तुरूंगातून नेमबाज आणले होते. 2007मध्ये सीबीआय चौकशीनंतर डेहराडून जिल्हा कोर्टाने नेमबाजांसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने नंतर हा निर्णय कायम ठेवला. या हत्येसाठी मंत्र्याच्या पत्नीने नेमबाज नेमले होते. या गुन्ह्यासाठी त्याला पत्नीसह तुरुंगात टाकण्यात आले.
भंवरी देवी प्रकरण - सप्टेंबर २०११
सहायक परिचारिका भंवरी देवीच्या बेपत्ता प्रकरणात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह संपूर्ण राजस्थान मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. नोव्हेंबर २०११मध्ये मंत्रीमंडळाने राजीनामा दिला. भंवरी देवी बेपत्ता होण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित मंत्री महिपल मदेरना यांना कॅबिनेटच्या राजीनाम्यापूर्वीच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले होते.
पारस देवी मृत्यू प्रकरण- नोव्हेंबर २०११
राजस्थानचे वन व पर्यावरण राज्यमंत्री रामलाल जाट यांनी संशयास्पद परिस्थितीत आपल्या नातेवाईकाची पत्नी पारस देवी यांच्या मृत्यूची बातमी येताच राजीनामा सोपविला. तथापि, आपल्या प्रतिमेला कलंक लावण्यासाठी हे आरोप केले जात आहेत आणि आपण चौकशीसाठी तयार आहोत, असे सांगून त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.
गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरण - २०१२
आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी हरियाणाचे गृह राज्यमंत्री गोपाल कांडा यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. 23 वर्षांच्या गीतिका शर्मा यांनी आपल्या आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात राजकारण्यांची नावे नमूद केली होती. कांडा यांनी छळ केल्याचाही त्यात उल्लेख होता. एफआयआर आणि तातडीने अटक झाल्यानंतर इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी)ने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
प्रिया रामानी #MeToo प्रकरण - 2018
२०हून अधिक महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केल्याने केंद्रीय परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता. अकबर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत जलपास 20पेक्षा जास्त महिला पुढे आल्या होत्या. यामध्ये अयोग्य स्पर्श करणे, जबरदस्तीने चुंबन घेणे आदी आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.