प्रयागराज : माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफ यांची पोलील संरक्षण असतानादेखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन्ही माफिया भावांची मीडियाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केली. या घटनेत आणखी एक बाब समोर आली आहे की, उमेश पाल यांच्याप्रमाणेच दोघा गुंडाची खुलेआम हत्या करण्यात आली.
24 फेब्रुवारीला उमेश पाल यांना घेराव घालून गुंडांनी हत्या केली होती. त्याचप्रकारे १५ एप्रिलच्या रात्री अतिक अहमद आणि अशरफ यांची खुलेआम गोळ्या घालून हत्या करण्यात आली. उमेश पाल यांना दोन पोलिसांची सुरक्षा मिळाली होती. तरीही पोलीस संरक्षण असताना त्यांची हत्या करण्यात आली. अतिक अहमद आणि अश्रफ यांनादेखील पोलीस संरक्षण असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे. अनेक पोलिसांच्या उपस्थितीत, हल्लेखोरांनी अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला.
हल्लेखोर स्वत:हून पोलिसांना आले शरण- उमेश पाल यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांनी चेहरा झाकला नव्हता. त्याचप्रमाणे अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांनीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला नाही. घटना घडवून आणण्यासाठी आलेले हल्लेखोर माध्यम प्रतिनिधीच्या वेशात आले होते. त्यावेळी त्यांच्या हातात कॅमेरा आणि माईक होता. उमेश पाल यांचा खून आणि अतिक अश्रफचा खून यात फरक एवढाच की उमेश पालचे हल्लेखोर घटनेनंतर पळून गेले. तर अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोर स्वत:हून पोलिसांना शरण गेले.
17 एप्रिलला होणार होती सुनावणी- उमेश पाल यांच्या अपहरण प्रकरणी 28 मार्च रोजी न्यायालयाने अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 11 एप्रिल रोजी अतिक अहमदला तर गुजरातमधील साबरमती तुरुंगातून 12 एप्रिल रोजी प्रयागराज येथील नैनी मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तिथे दोघांना 13 एप्रिल रोजी सीजेएम कोर्टात हजर करण्यात आले. तेथून न्यायालयाने त्याला 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता अतिक आणि अश्रफ यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात येईल, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. मात्र, त्यापूर्वीच दोन्ही गुंडांची हत्या झाली आहे.
हेही वाचा - Atiq Murder Case : अतिक-अश्रफ हत्याकांड करणारे आरोपी कोण आहेत? हत्येचे सांगितले धक्कादायक कारण