नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत नाव आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांचे. काँग्रेसचे कट्टक कार्यकर्ते असलेले डी.के. शिवकुमार हे गांधी घराण्याचेही जवळचे मानले जातात. डीके शिवकुमार हे सध्या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. ते कनकापुरा मतदारसंघातून 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कोण आहेत डी. के. शिवकुमार : या निवडणूकीत ते भाजपचे वरिष्ठ नेता आणि कर्नाटकचे मंत्री आर. अशोक यांच्याविरोधात कनकपुरा येथून उभे राहिले होते. निवडणूकीत डीके शिवकुमार यांनी भाजपच्या नेत्याला तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने हरवलं आहे. त्यामुळे डीके पुन्हा एकदा जायंट किलर म्हणून समोर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फक्त शेवटच्या दिवशीच मतदार संघात प्रचार केला होता.
सर्वात श्रीमंत आमदार : डीके शिवकुमार हे कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे. 2013 मध्ये ते जेडी (s) PGR सिधिंयांना हरवून 30,000 हून अधिक मतांनी निवडून आले होते.
पंतप्रधानांचाही केला पराभव : केवळ सिधिंयाच नाही तर शिवकुमार यांनी जनता दल (s) प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच. डी कुमारस्वानी यांना बंगळुरू ग्रामीणमधून हरवलं आहे. या यशानंतर त्यांना जाइंट किलर नावाने ओळख मिळाली. सध्या डी. के शिवकुमार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. 22 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली आहे.
राज्यशास्त्र विषयात MA : डी. के शिवकुमार हे राजकारणी तर आहेतच पण शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्यातही त्यांचा सहभाग राहिला आहे. 2006 मध्ये कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी म्हैसूरमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयात MA केले आहे.
कनकपुरा मतदारसंघाचे ते आठ वेळा आमदार : डी. के शिवकुमार यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कनकपुरा इथून निवडणूक लढवली आहे. कनकपुरा मतदारसंघाचे ते आठ वेळा आमदार राहिले आहेत. कनकपुरामध्ये यंदा कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी डी के शिवकुमार यांच्याविरोधात निवडणूक लढवली. डी के शिवकुमार यांनी आर. अशोक यांचा पराभव केला.
शेकडो कोटींची संपत्ती : डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिकची संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे त्यांना ‘संकटमोचक’ म्हटले जाते.
काँग्रेसला नवा आशावाद मिळाला : सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाने त्यांची चौकशी केली आहे. कर्नाटक निवडणुकीआधी 104 दिवस ते तुरुंगात होते. आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. डी. के. शिवकुमार यांच्यामुळे काँग्रेसला नवा आशावाद मिळाला आहे. काँग्रेसला अच्छे दिन येण्याची ही सुरूवात असल्याचे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत.
गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत असे अनेक नेते चर्चेत होते, पण सर्वात जास्त चर्चेत असलेले एक नाव म्हणजे डी. के शिवकुमार. डी.के. शिवकुमार सध्या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते आहेत. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची थेट सिद्धरामय्या यांच्याशी लढत आहे.
अनेक सरकारे वाचवली : यासोबतच ते काँग्रेस पक्षाचे संकटमोचक आहेत. डी. के शिवकुमार यांनी देशातील अनेक राज्यात काँग्रेसचे सरकार कोसळण्यापासून वाचवले आहेत. त्यामधील एक म्हणजे महाराष्ट्रातील सरकार २००२ मध्ये महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना देखील शिवकुमार याचं रिसॉर्ट राजकारण करावे लागले होते.
विलासराव देशमुख यांचं सरकार वाचल : २००२ मध्ये राजकीय परिस्थितीमुळे अविश्वास ठरावाला सामोरे जाणारे विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना बँगलोरला आणल होत. महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांच सरकार पडण्यापासून वाचवण्यासाठी राज्यातल्या ४० काँग्रेस आमदारांना डीके शिवकुमार यांच्या देखरेखीखाली बेंगलोरच्या ईगलटन रिसॉर्टमध्ये ठेवल गेल. त्यामुळे राज्यातील विलासराव देशमुख यांचं सरकार वाचल होत.
40 वर्षापासून विधानसभेवर निर्वीवाद विजयी : डी.के शिवकुमार यांनी ओळख एक लढावू कार्यकर्ता अशी आहे. कुणालाही न भिणारा हा काँग्रेसचा दमदार कार्यकर्ता आहे. गेली 40 वर्षापासून विधानसभेवर निर्वीवाद विजयी मिळवणारा हा कर्यकर्ता काँग्रेससाठी संकटमोचक राहीला आहे. तसेच, गांधी घराण्याचा अत्यंत विश्वसनीय चेहला म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जाते. आता शिवकुमारच मुख्यमंत्री व्हावेत अशी कर्नाटकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांसह जनतेचीही भावना आहे.
हेही वाचा : कर्नाटकातील निकालावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया ; जयराम रमेश म्हणाले - जनतेने मोदींना नाकारले