बाडमेर Mevaram Jain Controversy : काही दिवसांपूर्वी एका महिलेनं बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या प्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला असून गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसंच या व्हिडिओ आणि फोटोजमध्ये मेवाराम जैन असल्याचा दावा केला जातोय. मात्र, ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओला दुजोरा देत नाही. दरम्यान, असं असतानाच आता काँग्रेसनं मेवाराम जैन यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
काय आहे प्रकरण : काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेनं माजी आमदार मेवाराम जैन यांच्यासह 9 जणांविरोधात जोधपूरच्या राजीव गांधी नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पीडितेनं एफआयआरमध्ये व्हिडिओचाही उल्लेख केला होता. तसंच त्यादरम्यान या व्हिडिओचे स्क्रीनशॉटही व्हायरल झाले होते. मात्र यावेळी संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झालाय.
-
कांग्रेस पार्टी से मेवाराम जैन की प्राथमिक सदस्यता तत्काल प्रभाव से निलंबित की जाती है। pic.twitter.com/QsE4MXaCK7
— Rajasthan PCC (@INCRajasthan) January 6, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कांग्रेस पार्टी से मेवाराम जैन की प्राथमिक सदस्यता तत्काल प्रभाव से निलंबित की जाती है। pic.twitter.com/QsE4MXaCK7
— Rajasthan PCC (@INCRajasthan) January 6, 2024कांग्रेस पार्टी से मेवाराम जैन की प्राथमिक सदस्यता तत्काल प्रभाव से निलंबित की जाती है। pic.twitter.com/QsE4MXaCK7
— Rajasthan PCC (@INCRajasthan) January 6, 2024
- 22 डिसेंबरला मेवाराम जैन यांनी त्यांच्यावर नोंदवण्यात आलेल्या बलात्कार आणि पॉक्सोच्या गुन्ह्याला आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयानं या प्रकरणातील माजी आमदार मेवाराम जैन यांच्या अटकेला 25 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. तसंच यासंदर्भातील तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.
मेवाराम जैन काँग्रेसमधून निलंबित : माजी आमदार मेवाराम जैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यांचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षातून निलंबित केले. राजस्थान पीसीएसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून याची पुष्टी केली. राजस्थान काँग्रेसनं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील जारी केलीय.
- चर्चेला उधाण : निवडणुकीच्या काळात देखील हे व्हिडिओ समोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळं राज्यात चर्चेला उधाण आलंय. तसंच याप्रकरणी सोशल मीडियावरही यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा -