ETV Bharat / bharat

Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल - सोनिया गांधी यांची तब्येत बातमी

काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ( Sonia Gandhi In Hospital ) दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

Congress president Sonia Gandhi
काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी
author img

By

Published : Jun 12, 2022, 3:12 PM IST

Updated : Jun 12, 2022, 8:27 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज रविवार (दि. 12 जुन)रोजी सकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, त्यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाचीही लागण झालेली आहे. ( Sonia Gandhi Health Deteriorated ) परंतु, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ( Sonia Gandhi Admitted ) कोणतेही काळजीचे कारण नाही अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. त्याचवेळी, सोनीया यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे असही सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

  • Congress interim president Sonia Gandhi admitted to Ganga Ram Hospital today owing to Covid-related issues. She is stable and will be kept at the hospital for observation, says Congress leader Randeep Singh Surjewala pic.twitter.com/AkDP5ncMg8

    — ANI (@ANI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्व हितचिंतकांचे त्यांच्या काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या हायकमांडला चांगले आरोग्य आणि चांगले स्वास्थ्य लाभावे यासाठी प्राथना केली आहे. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोनिया गांधींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनीया गांधी यांना लवकरात लवकर बरे लागावे यासाठी आपण प्रार्थना करूया असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

  • Just learnt that senior Congress leader Mrs Sonia Gandhi has been hospitalized due to covid. All of us pray for her early recovery and return to public life soon. May God bless you, Soniaji. Regards.

    — Mamata Banerjee (@MamataOfficial) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनीया गांधी यांना 2 जून रोजी कोरोना झाल्याचे निदान झाले आणि त्यांना सौम्य ताप आणि काही लक्षणे होती. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने सोनियांना नव्याने समन्स बजावले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यानंतर आणखी अनेक काँग्रेस नेत्यांनाही कोरोना झाला आहे. हे सर्व नेते एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची माहिती मिळाली.

हेही वाचा - Terrorist killed: श्रीनगर भागात चकमकीत दहशतवादी ठार

Last Updated : Jun 12, 2022, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.