ETV Bharat / bharat

Kharge Address Party workers : ... तर  संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक जिंकू - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

पाटणा येथील सदकत आश्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे भारतात विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे पाटणा येथे आले आहेत. त्यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.

काँग्रेसचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
author img

By

Published : Jun 23, 2023, 2:02 PM IST

पाटणा : लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटण्यात पहिल्यांदाच विरोधी पक्षाची बैठक पार पडत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत आहेत. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे सकाळी पाटण्याला पोहोचले. विरोधीपक्षाच्या बैठकीला जाण्याआधी पाटण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.

संपूर्ण भारत जिंकू : पाटणा येथील सदकत आश्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहोत.सर्व विरोधी पक्षांना एकत्र येत 2024च्या निवडणुका एकत्र लढवायच्या असून राहुल गांधी यांनी यासाठी पावले उचलली आहेत. याच कारणाने आपण आज येथे बैठक घेत असल्याचेही खरगे म्हणाले.

बिहार काँग्रेसची विचारधारा कधीही सोडणार नाही. आपण बिहार जिंकले तर संपूर्ण भारत जिंकू, मल्लिकार्जुन खरगे

विचारसरणीमध्ये लढा सुरू : सदकत आश्रमात राहुल गांधींनीही काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी परत एकदा भाजपवर टीका केली. भारतात सध्या दोन विचारसरणीमध्ये लढा सुरू आहे. भारत जोडो आणि भारत तो़डो या विचारसणीमध्ये लढा चालू आहे. भाजप देशाला तोडण्याचे काम करत आहे, द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. भाजप देश तोडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस पक्ष जोडण्याचे काम करत आहे. भारत जोडो यात्रेत तुम्ही मदत केली, कारण तुम्ही काँग्रेसच्या विचारधारेला मानता. काँग्रेसचा डीएनए बिहारमध्ये असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले.

  • #WATCH | Congress president Mallikarjun Kharge and party leader Rahul Gandhi to address the party workers in Bihar's Patna shortly

    Both the leaders are in the city to attend the Opposition leaders' meeting. pic.twitter.com/166bdn7izC

    — ANI (@ANI) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस गरिबांचा पक्ष: भाजपावर टीका करताना राहुल गांधींनी भाजप पराभूत होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपने कर्नाटकमध्ये मोठी भाषणे केली, पण शेवटी त्यांचा पराभव झाला. याच बरोबर तेलगंणा, मध्यप्रदेश , राजस्थानमध्ये काँग्रेसच सत्तेत येणार आहे. कारण देशातील जनतेला कळले आहे की, नरेंद्र मोदी आणि भाजपचे काम फक्त दोन-तीन लोकांना फायदा मिळवून देण्याचे काम करतात. देशातला सगळा पैसा त्यांच्या हवाली केला आहे. पण काँग्रेस पक्ष हा गरिबांसोबत राहणारा आहे. तुम्ही येथे आला आहात म्हणून मी तुमचे आभार मानतो, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Karnataka Congress: विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे सर्व अधिकार मल्लिकार्जुन खरगेंकडे, बैठकीत झाला निर्णय
  2. Nitish Kumar Delhi Visit : 2024 च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांची मोर्चेबांधणी ; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींची घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.