नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाषण करताना हा क्षण भावूक असल्याची भावना मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केली. तसेच “एका सामान्य कुटुंबातील मुलाला काँग्रेस अध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे”, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जून खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले.
सोनिया गांधींनी दिल्या शुभेच्छा - काँग्रेस अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खरगे यांना शुभेच्छा दिल्या आहेच. मी खरगे यांचे मनापासून अभिनंदन करते. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभावचा काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षपदाचा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्व केला आहे. मी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
माझ्या खांद्यावरून एक भार उतरला आहे - मल्लिकार्जुन खरगे यांनी जवळपास 23 वर्षे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याने त्यांना आराम वाटल्याचे सोनिया गांधी यांनी आज सांगितले. सोनिया गांधी म्हणाल्या, "मी माझे कर्तव्य माझ्या क्षमतेनुसार पार पाडले. आज मी या जबाबदारीतून मुक्त होणार आहे. माझ्या खांद्यावरून एक भार उतरला आहे. मला आराम वाटत आहे." "ही मोठी जबाबदारी होती, आता जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आहे, असही त्या म्हणाल्या.
एकजुटीने पुढे जायचे - सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, आज देशातील लोकशाही मूल्यांचे संकट हे सर्वात मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की खर्गे संपूर्ण पक्षाला प्रेरणा देतील. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होत राहील. काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. काँग्रेससमोर अनेक आव्हाने आहेत. त्याचा सामना आपण कसा करतो हे आव्हान आहे. पूर्ण ताकदीने, एकजुटीने पुढे जायचे आहे आणि यशस्वी व्हायचे आहे असा विश्वासही त्यांनी केला आहे.
सुकानू समिती - काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या 47 सदस्यीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. शशी थरूर यांना मात्र त्यामध्ये स्थान नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या महत्त्वपूर्ण निर्णयात बुधवारी 47 सदस्यीय सुकाणू समिती स्थापन केली. काँग्रेस कार्यकारिणी (CWC) च्या जागी ही समिती काम करेल. काँग्रेसने जारी केलेल्या यादीनुसार, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पॅनेलमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. ए के अँटोनी, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, अंबिका सोनी, अजय माकन, हरीश रावत, अभिषेक मनु सिंघवी असे इतर प्रमुख नेतेही पॅनेलचा भाग आहेत. या समितीमध्ये आनंद शर्मा यांचाही समावेश आहे. ते G-23 चा भाग होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या गटाने माजी प्रमुख सोनिया गांधी यांना संघटनात्मक फेरबदलासाठी पत्र लिहिले होते.
प्रभारी यांनी अध्यक्षांना आपले राजीनामे दिले - काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी बुधवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काँग्रेस सुकाणू समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह एकूण 47 ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काम करेल. आज सकाळी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एआयसीसी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, एआयसीसी सरचिटणीस आणि प्रभारी यांनी अध्यक्षांना आपले राजीनामे दिले आहेत.