ETV Bharat / bharat

Morbi Bridge collapsed : काँग्रेसची 'परिवर्तन यात्रा' लांबली; पंतप्रधान मोदींची आभासी पद्धतीने मिटींग

मोरबी पूल दुर्घटनेत प्राण ( Morbi Bridge Collapsed ) गमावलेल्यांच्या स्मरणार्थ राजकीय पक्षांनी त्यांचे राजकीय कार्यक्रम एकतर पुढे ढकलले किंवा रद्द केले. 31 ऑक्टोबरपासून सुरू होणारी काँग्रेसची 'परिवर्तन यात्रा' आता 1 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली ( Congress postpones Parivartan Yatra ) आहे.

author img

By

Published : Oct 31, 2022, 5:11 PM IST

Updated : Oct 31, 2022, 5:45 PM IST

Morbi Bridge collapsed
काँग्रेसची परिवर्तन यात्रा लांबली

अहमदाबाद (गुजरात) : मोरबी पूल दुर्घटनेत प्राण ( Morbi Bridge Collapsed ) गमावलेल्यांच्या स्मरणार्थ राजकीय पक्षांनी त्यांचे राजकीय कार्यक्रम एकतर पुढे ढकलले किंवा रद्द केले. 31 ऑक्टोबरपासून सुरू होणारी काँग्रेसची 'परिवर्तन यात्रा' आता 1 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली ( Congress postpones Parivartan Yatra ) आहे.

परिवर्तन यात्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 नोव्हेंबर रोजी भाजपच्या पेज कमिटीच्या सदस्यांना संबोधित करणार ( PM virtual meeting ) होते. हा कार्यक्रम रद्द केला जाईल, असे भाजप मीडिया समन्वयक यज्ञेश दवे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी दिलेल्या निवेदनात अशी माहिती दिली आहे की, पक्षाच्या पाच परिवर्तन यात्रेला राज्याच्या विविध भागांतून ३१ ऑक्टोबरला सुरुवात होणार ( Political Events Postponed )आहे. ती आता १ नोव्हेंबरला निघणार आहे. हा अहवाल येईपर्यंत मृतांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. 12 जण राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांचे दूरचे नातेवाईक आहेत.

मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त : या दुःखद घटनेत, मोरबी जिल्हा प्रशासनाने काही मुलांची सुटका केली आहे. ज्यांचे जवळचे नातेवाईक बेपत्ता आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. ज्यात जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकांनी मुलांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी मोरबी पूल कोसळून मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. पूल जनतेसाठी पुन्हा खुला करण्यापूर्वी फिटनेस प्रमाणपत्र दिले गेले होते का, असा सवाल त्यांनी केला आहे. राज्य सरकारला या दुर्घटनेबद्दल गुजरातमधील लोकांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. हा अपघात हा भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी केला आहे. राजकीय फायदा घेण्यासाठी निवडणुकीपूर्वी हा पूल जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला. या दुर्घटनेत निष्पाप मुले, महिला व वृद्धांना जीव गमवावा लागला आहे.

Last Updated : Oct 31, 2022, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.