ETV Bharat / bharat

Priyanka Gandhi rally in Solan : प्रियांका गांधी सोलनमध्ये; आंदोलनावर बसलेल्या कर्मचाऱ्यांची घेतली भेट - सरचिटणीस प्रियांका गांधी सोलन येथे पोहचल्या

ओपीएसच्या मागणीसाठी आंदोलनावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी सोलन येथे पोहचल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सोलन येथे ही पहिलीच मोठी रॅली (Priyanka Gandhi rally in Solan) असेल, जिथून प्रियंका गांधी आणि हिमाचल काँग्रेस निवडणुकीचा बिगुल फुंकतील.

Priyanka Gandhi rally in Solan
रचिटणीस प्रियांका गांधी सोलन येथे पोहचल्या
author img

By

Published : Oct 16, 2022, 10:56 PM IST

सोलन : हिमाचल विधानसभा निवडणूक २०२२ संदर्भात सोलन येथे (Congress parivartan pratigya rally) काँग्रेसची परिवर्तन (Priyanka Gandhi rally in Solan) प्रतिज्ञा रॅली आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. प्रियांका गांधी यांनी परिवर्तन प्रतिज्ञा रॅलीत परिवर्तनसाठी तयार केलेल्या गाण्याचे अनावरण केले. सोलनच्या थोडो मैदानात झालेल्या या सभेत प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. रॅलीला पोहोचण्यापूर्वी प्रियंका गांधी यांनी ओपीएसच्या मागणीसाठी आंदोलनावर बसलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

प्रियंका गांधींची घोषणा : हिमाचलमधील सोलन (priyanka gandhi in himachal) येथे झालेल्या काँग्रेसच्या परिवर्तन प्रतिज्ञा मेळाव्यात प्रियंका गांधी यांनी पहिल्या मंत्रिमंडळात एक लाख सरकारी पदे भरली जातील आणि जुनी पेन्शन दिल्या जाईल, अशी घोषणा केली आहे. आमचे सरकार सत्तेवर येताच, आम्ही काँग्रेसच्या 10 गोष्टींवर अंमलबजावणी करू, असे प्रियंका म्हणाल्या. त्याअंतर्गत 5 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील, जुनी पेन्शन लागू केली जाईल, 18 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील, याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 4 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासोबतच, अंमली पदार्थांविरोधात कठोर धोरण आखले जाईल, असे प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.

प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल : प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने 5 वर्षात काहीही केले नाही. कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत आणि अनेक महिन्यांपासून जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत, पण सरकार काहीही ऐकत नाही. आज तरुण बेरोजगार फिरत असून; ६३ हजार पदे रिक्त आहेत. मोदींप्रमाणे जयराम ठाकूरही बेरोजगारीला प्रोत्साहन देत आहेत. अग्निवीर ४ वर्षांनी निवृत्त होईल आणि त्याला निवृत्ती वेतन मिळणार नाही. भाजपने तरुणांचे भविष्य, महिलांचे हक्क आणि वृद्धांचे पेन्शन हिरावून घेतले असून; जमिनदार आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असे प्रियंका म्हणाल्या. त्यामुळे हे सरकार पाडण्याची तयारी करा.

प्रियंका गांधींना आली इंदिरा गांधींची आठवण : सोलनमध्ये पोहोचलेल्या प्रियंका गांधी यांनी प्रथम शुलिनी माता मंदिर गाठले आणि देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी प्रियंका गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचीही आठवण काढली. प्रियंका म्हणाल्या की, इंदिरा गांधींचा हिमाचलशी सखोल संबंध होत. कदाचित त्यांना त्यांच्या हौतात्म्याबद्दल आधीच माहिती असेल, म्हणून त्यांनी कुटुंबातील सदस्यांना आधीच सांगितले होते की, माझ्या काही अस्थी हिमालयात विसर्जित करा. प्रियंका म्हणाली की, जेव्हा मी हिमाचलच्या शिमला येथे घर बांधले, तेव्हा इंदिरा गांधींना हिमाचलमध्ये स्थायिक होण्याची इच्छा होती.

हे नेते पोहोचले रॅलीत : छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे निवडणूक प्रभारी भूपेश बघेल, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते कुलदीप राठोड, अलका लांबा, विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री, हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह, सोलनच्या आतापर्यंतच्या कार्यकारिणी परिवर्तन प्रतिज्ञा रॅलीचे अध्यक्ष विनय कुमार, राजेंद्र राणा, माजी मंत्री सुधीर शर्मा, आमदार हर्षवर्धन चौहान, हिमाचल काँग्रेसचे सहप्रभारी गुरकीरत सिंग कोटली, आमदार रोहरू, रामपूर, बारसर, निवडणूक सहप्रभारी तेजिंदर सिंग बिट्टू उपस्थित होते.

शिमला लोकसभा मतदारसंघातील 17 जागांवर लक्ष : काँग्रेसची ही रॅली शिमला लोकसभा मतदारसंघासाठी होती. या रॅलीच्या माध्यमातून शिमला लोकसभा मतदारसंघातर्गत येणाऱ्या १७ विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिमला लोकसभा मतदारसंघात सोलन आणि सिरमौर जिल्ह्यातील सर्व 5-5 जागा येतात, तर शिमला जिल्ह्यातील 8 पैकी 7 जागा येतात. 2017 मध्ये काँग्रेसने भाजपला बरोबरीची लढत दिली. गेल्या निवडणुकीत, शिमला लोकसभा मतदारसंघांतर्गत 17 जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने 8-8 जागा जिंकल्या, तर माकपला एक जागा मिळाली. काँग्रेस ही कामगिरी सुधारू इच्छिते.Priyanka Gandhi rally in Solan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.