नवी दिल्ली - 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता व्युहनिती तयार करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी झाली आहे. निवडणुकीपूर्वी देशभरात निदर्शने करण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
काँग्रेसने दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत पेगासस, राफेल, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, मागास वर्गावरील अत्याचार, महिलांविरोधातील अत्याचार आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रादेखील उपस्थित होत्या.
हेही वाचा-दहशतवाद्यांचा ग्रेनेडने पुलावामात सुरक्षा दलावर हल्ला; चार नागरिक जखमी
माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, की ही समिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला काही शिफारशी देणार आहे. आंदोलन कसे करायचे, याबाबत पक्षाचे हायकमांड हे निर्णय घेणार आहेत.
हेही वाचा-भाजप हिमाचल प्रदेशातही करणार नेतृत्वात बदल? मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
एकता हा काँग्रेसचा विचार
सुत्राच्या माहितीनुसार समितीच्या बैठकीत विविध प्रश्न उपस्थित करण्याकरिता एनजीओ, नागरी समुदाय आणि विविध बुद्धिमान घटकांचा उपयोग करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याबाबत विचारले असता दिग्विजय सिंह म्हणाले, की आमचा संघर्ष हा वैचारिक आहे, कोण्या एका व्यक्तीविरोधात नाही. काँग्रेसची लढाई ही देशाच्या एकतेला धक्का पोहोचविणाऱ्यांविरोधता आहे. एकता हा काँग्रेसचा विचार आहे. जे नागरी समुदाय आणि राजकीय पक्ष आम्हाला समर्थन देतात, त्यांचे स्वागत आहे.
राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष करावे- सदस्याचा प्रस्ताव-
राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव समितीचे सदस्य उदित राज यांनी मांडला. मागासवर्गाला परत आणणे आणि जातीवर आधारीत एनजीओपर्यंत पोहोचण्याची गरजही उदित राज यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-मोदी सरकारमध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी
हे आहेत समितीमध्ये सदस्य
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 9 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये दिग्विजय सिंह, प्रियंका गांधी, उत्तम कुमार रेड्डी, मनीश छराघ, बी. के. हरी प्रसाद, रिपून बोरा, उदित राज, रागिनी नायक आणि झुबेर खान यांचा समावेश आहे.