नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शुक्रवार (दि. 8 जुलै) रोजी एम्समध्ये आरजेडीचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. राहुल गांधी यांनी लालू यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत - आज दुपारी 1.15 वाजता राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. लालू यादव आणि राहुल गांधी यांची ही भेट राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे, कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. आरजेडी प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. लालूजी आता पलंगावरून उठून बसू शकतात, असे त्यांची मुलगी मिसा भारती यांनी दिली आहे.
ते आजारातून बरे होत आहेत - पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील शासकीय निवासस्थानी पडल्याने लालूंच्या खांद्याला फ्रॅक्चर आणि दुखापत झाली. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना पाटण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, लालू यांच्या पत्नी राबडी देवी यांनी सांगितले की, ते आजारातून बरे होत आहेत.
हेही वाचा - जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे खास वाराणसी कनेक्शन