नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणात ( Rahul gandhi comment on pm modi ) अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ( National herald case ) प्रतिक्रिया दिली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही ( Congress is not afraid of pm modi says rahul gandhi ) आणि आम्हाला धमकावून गप्प बसवता येणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. देश आणि लोकशाही यांच्या रक्षणासाठी आणि एकोपा राखण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकारांना म्हटले.
-
#WATCH | Delhi: "I am not at all scared of Modi. They can put up more barricades. Truth can't be barricaded..," says Congress MP Rahul Gandhi after reaching the Parliament. pic.twitter.com/dsJBCQKQ2C
— ANI (@ANI) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Delhi: "I am not at all scared of Modi. They can put up more barricades. Truth can't be barricaded..," says Congress MP Rahul Gandhi after reaching the Parliament. pic.twitter.com/dsJBCQKQ2C
— ANI (@ANI) August 4, 2022#WATCH | Delhi: "I am not at all scared of Modi. They can put up more barricades. Truth can't be barricaded..," says Congress MP Rahul Gandhi after reaching the Parliament. pic.twitter.com/dsJBCQKQ2C
— ANI (@ANI) August 4, 2022
हेही वाचा - IB Red Alert On Indian Independence day 15 August: स्वातंत्र्य दिनी मोठ्या घातपाताची शक्यता, अलर्ट जारी
आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही - राहुल गांधी : पळून जाण्याबद्दल कोण बोलत आहे? ते बोलत आहेत. आम्ही घाबरत नाही. आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही. जे करायचे आहे ते करा. काही फरक पडत नाही, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. माझे काम देशाचे रक्षण करणे, लोकशाहीचे रक्षण करणे, देशात एकोपा राखणे आहे, ते मी करत राहीन, असेही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसने दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी पक्षाचे मुख्यालय, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानांना वेढा घातला आहे. सरकारने ईडीचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यापूर्वी 'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली होती.
संसदेत देखील गदारोळ होण्याची शक्यता - मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी दिल्लीतील 'नॅशनल हेराल्ड' कार्यालयातील 'यंग इंडियन' कंपनीचा परिसर तात्पुरता सील केला. यावर काँग्रेस प्रचंड नाराज झाली आहे. यावर संसदेत देखील गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राहुल यांची चौकशी केली आहे. सोनिया गंधीची देखील चौकशी केली. ईडीच्या या कारवाईनंतर काँग्रसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आंदोलने देखील झाली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यावर काय प्रतिक्रिया देतील याकडे लक्ष लागले होते. मी पंतप्रधानांना घाबरत नाही, असे आज राहुल यांनी म्हणत थेट भाजपविरोधात दोन हात करण्याचा निश्चयच केल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - गरबा खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आयोजकांकडून नवरात्री पासवर जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय