ETV Bharat / bharat

Congress Election Campaign : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्यांच्या एकजुटीवर भर, मध्यप्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराला सुरवात - congress

यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने नेत्यांना एकत्र ठेवण्याासाठी कंबर कसली आहे. निवडणुकीपूर्वी तिन्ही राज्यांमध्ये नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसने योजना तयार केली आहे.

Congress Election Campaign
Congress Election Campaign
author img

By

Published : Jun 18, 2023, 4:53 PM IST

Updated : Jun 18, 2023, 10:34 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पुनरागमन करण्याची तयारी करीत आहे. पक्ष आपल्या समर्थकांना एकत्र ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटकमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता काँग्रेसचा मोर्चा मध्यप्रदेशच्या निवडणुकीवर वळला आहे. काँग्रेसने 12 जून रोजी मध्यप्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराला सुरवात केली आहे. यावेळी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांनी जबलपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.

कर्नाटकच्या धर्तीवर पाच आश्वासने जाहीर : जनतेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर पाच आश्वासने जाहीर केली आहेत. याच अश्वासनावर काँग्रेसने हिमाचल प्रदेश कर्नाटकात विधानसभेत भाजपला पराभूत केले होते. एका काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर आश्वासनांची पूर्तता करेल. ही केवळ आश्वासने नसून ती प्रत्यक्षात आणली जात असल्याचा स्पष्ट संदेश मतदारांना प्रियंका गांधींनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसची परत घरवापसी : पक्षाच्या नेत्याने राजस्थान, छत्तीसगडची उदाहरणे देखील दिली, जिथे त्यांनी निवडणुकीदरम्यान लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करीत आहे. आम्हाला आशा आहे की मध्य प्रदेशात पुन्हा आमचा विजय होईल असा विश्वास काँग्रेस नेत्याने व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्षाचे दिग्गज दिग्विजय सिंह राज्यात चांगले काम करत आहेत. पक्षाचा विजय व्हावा यासाठी दोन्ही नेत्यांनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसची परत घरवापसी होणार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित : माजी मुख्यमंत्री कमलनाथ प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, तर दिग्विजय सिंह विधानसभा स्तरावर लक्ष केंद्रित करत आहेत. दोघेही नेत्यांना एकत्र ठेण्यासाठी बैठका, मेळावे घेत आहेत. दोन्ही नेत्यांमधील समजूतदारपणामुळे काँग्रेसला भाजपच्या बालेकिल्ल्यासह ग्रामीण भागात चांगली संधी मिळणार आहे. भाजपचे अनेक गट देखील राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मदत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसमध्ये बंडखोरीचा फटका : भाजपमधील दुफळीमुळे राज्यातील सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांचे पलायन होत आहे. ज्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह मार्च 2020 मध्ये काँग्रेस सोडणारे बैजनाथ यादव यांचा समावेश आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला देशातील सर्वात जुन्या नेत्यांची घरवापसी कण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये बंडखोरीचे नेतृत्व करणारे सिंधिया यांनी त्यांच्या 22 निष्ठावंत आमदारांसह पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पडले होते.

हेही वाचा - Manisha Kayande : वर्धापनदिनी ठाकरे गटाला धक्का, विधान परिषदेच्या महिला आमदार मनिषा कायंदे करणार शिवसेनेत प्रवेश

Last Updated : Jun 18, 2023, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.