ETV Bharat / bharat

लखीमपूर खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"

उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वॉड्रा यांना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीकडे जाताना अटक केली. यावरून प्रियांकांनी पोलिसांना खडसावले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी दावा केला, की 'प्रियांकांना हरगाव येथून अटक करण्यात आली'. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेती कायद्यांविरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले.

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi
author img

By

Published : Oct 4, 2021, 10:21 AM IST

Updated : Oct 4, 2021, 12:36 PM IST

लखनऊ : हिंसाचारग्रस्त लखीमपूर खेरी जिल्ह्यात पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वॉड्रा यांना सोमवारी हरगाव येथून अटक करण्यात आली आहे, असा दावा पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेतकरी आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले आहेत.

लखीमपूर खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"

अजय मिश्रांच्या मुलाने चिरडले 8 शेतकऱ्यांना

शेती कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी काळे झेंडे हातात घेऊन आंदोलन करत होते. या दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आंदोलकांवर गाडी चढवली. यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेनंत प्रियांका गांधी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाल्या. मात्र त्यांना अनेक ठिकाणी रोखण्यात आलं. प्रथम त्यांना लखनौ विमानतळावर रोखण्यात आले.

प्रियांकाना अटक

प्रियांका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या. मात्र पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले. पण प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरंट नसल्याने प्रियांका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला सीतापूरच्या हरगाव येथे ताब्यात घेतले.

वॉरंट असेल तर अटक करा - प्रियांका

"आजची घटना दर्शवते की हे सरकार राजकारणाचा वापर शेतकर्‍यांना कापण्यासाठी करत आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. भाजपाच्या विचारसरणीचा नाही. मी पीडितेच्या नातेवाईकांना भेटण्याचा निर्णय घेऊन कोणताही गुन्हा करत नाही. तूम्ही कोण आहात? आम्हाला का थांबवत आहात? तुमच्याकडे वॉरंट असायला हवे?", असे म्हणत प्रियांका गांधींनी पोलिसांना खडसावले.

प्रियांकांना अटक केल्याचा काँग्रेसचा दावा

या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी ट्विट केले, की "शेवटी तेच घडले, जे भाजपकडून अपेक्षित होते. महात्मा गांधींच्या लोकशाही देशात, 'गोडसे'च्या उपासकांनी आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना हरगावात अटक केली आहे. प्रियांकांनी अन्नदात्याला भेटण्यासाठी मुसळधार पाऊस आणि पोलीस बळाशी संघर्ष केला. ही लढाईची फक्त सुरुवात आहे!! किसान एकता जिंदाबाद".

प्रियांकांचा योगी सरकारवर निशाणा

उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना हरगाव, सीतापूरमध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी राज्यातील योगी सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. पोलिसांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'तुम्ही मला जबरदस्तीने घेऊन जात आहात. तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुम्ही लोक माझ्याशी चुकीचे वागत आहात. मला सर्व काही समजते. तुमच्या उत्तर प्रदेश राज्यात कायद्याचे राज्य असू शकत नाही, पण देशात आहे. तुम्ही लोक माझे अपहरण करत आहात', असे प्रियांकांनी म्हटले.

'भाजप देशातील शेतकऱ्यांचा किती द्वेष करतो? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? जर त्यांनी आवाज उठवला तर तुम्ही त्यांना गोळ्या घालणार का, त्यांना गाडीने चिरडणार का? हा शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपच्या क्रूर विचारसरणीचा नाही. किसान सत्याग्रह बळकट होईल आणि शेतकऱ्याचा आवाज मोठा होईल', असे ट्विट प्रियांका गांधींनी केले आहे.

हेही वाचा - लखीमपूर खेरी येथे नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम...

Last Updated : Oct 4, 2021, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.