ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रेजुल हक यांचे कोरोनामुळे गुरुवारी निधन झाले. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रेजुल हक यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

रेजुल हक
रेजुल हक
author img

By

Published : Apr 15, 2021, 4:09 PM IST

कोलकाता - देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात अनेकांनी निष्काळजीपणा करत कोरोना नियमांचे पालन केले नाही. हा निष्काळजीपणा जीवावर बेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रेजुल हक यांचे कोरोनामुळे गुरुवारी निधन झाले.

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रेजुल हक यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव रोहन मित्रा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे बुधवारी पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूची 5 हजार 892 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून आजपर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.

निवडणूक आयोगाने कोरोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलविली -

विधानसभेसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातील चार टप्पे पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिल रोजी होणार आहे. प्रचारासाठी पक्षांच्या नेत्यांकडून सभा घेण्यात येत आहे. या सभांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे.महत्त्वाचे म्हणजे देशातील बर्‍याच राज्यांत कोरोना विषाणूची स्थिती अत्यंत वाईट आहे. गुरुवारी, एका दिवसात देशभरात कोरोना विषाणूचे 2,00,739 नवीन रुग्ण आढळले. दैनंदिन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे देशात सक्रिय प्रकरणांची संख्याही 14,71,877 वर पोहचली आहे.

तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू -

तामिळनाडूमधील काँग्रेसचे उमेदवार पीएसडब्ल्यू माधव राव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी श्रीविलिपुथुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर ते आजारी पडले होते. तसेच त्यांच्या फुफ्फुसातही इन्फेक्शन झालं होतं. श्रीविलिपुथुर मतदारसंघातून माधव राव यांचा विजय झाल्यास पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. जर त्यांचा पराभव झाला. तर निवडणूक घेण्यात येणार नाही. तामिळनाडूतील 234 विधानसभेच्या जागांसाठी सहा एप्रिलला मतदान झालं. इथे केवळ एकाच टप्प्यात मतदान पार पडलं.

ओडिशामध्ये काँग्रेस उमेदवाराच मृत्यू -

ओडिशामधील पिपिलि पोटनिवडणुकीमधील काँग्रेस उमदेवार अजित मंगराज यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. भुवनेश्वरमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपोलो रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी राकेश राय यांनीही माहिती दिली. मंगराज यांनी 10 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याचे फेसबूक पोस्टद्वारे सांगितले होते. पिपिलि विधानसभा मतदारसंघात 17 एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र, अजित मंगराज यांच्या निधनानंतर निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाने जारी केलेली नाही. भाजपा आमदार प्रदीप महारथी यांचे निधन झाल्याने पिपिली मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहेत.

हेही वाचा - अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी; राहुल गांधींची केंद्रावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.