ETV Bharat / bharat

Shivaji Statue In Mangaluru : मंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचांचा पुतळा बसवण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध - maharashtra karnataka border dispute

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाचा वाद वाढत असताना मंगळुरू येथे चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. ( Shivaji Statue In Mangaluru ) मंगळुरू सिटी कॉर्पोरेशन (MCC) ने २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. ( Cong Opposes Decision To Install Chhatrapati Shivaji Statue )( maharashtra karnataka border dispute )

Shivaji Statue In Mangaluru
मंगळुरूमध्ये शिवाजीचा पुतळा
author img

By

Published : Dec 2, 2022, 8:07 AM IST

बंगळुरू : मंगळुरू येथील महावीर सर्कल (पंपवेल सर्कल) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार ( Shivaji Statue In Mangaluru ) आहे. छत्रपती शिवाजी मराठा संघटनेच्या मागणीवरून मंगळुरू महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मंगळुरू नगरपरिषदेची बैठक झाली तेव्हा विरोधी पक्षनेते नवीन डिसोझा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने (एमईएस) कर्नाटकच्या विरोधात काय बोलले याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, एमईएस महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असताना मंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य आहे. ( Cong Opposes Decision To Install Chhatrapati Shivaji Statue ) ( maharashtra karnataka border dispute )

छत्रपी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य : एमईएस कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असताना शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसचे सदस्य शशिधर हेगडे म्हणाले की, किनारी भागातील स्वातंत्र्यसैनिक आणि यश मिळविणार्‍यांपैकी कोटी-चेन्नया यांचा दोघांचा पुतळा बसवायचा पाहिजे. शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नये, असे पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितले. नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच असताना परिषदेचे मुख्य व्हीप प्रेमानंद शेट्टी यांनी हा प्रस्ताव यापूर्वीच गेल्या सभेत मंजूर करून विरोधकांचे आक्षेप नोंदवण्यात आल्याचे सांगितले. हिंदू आदर्शांना काँग्रेस नेहमीच विरोध असल्याचा भाजपच्या नगरसेवकाने आक्षेप नोंदविला आहे.

पुतळा बसवण्यास विरोध : महाराष्ट्र एकीकरण समितीचा कर्नाटकला विरोध असल्याच्या कारणावरून मंगळुरू शहर कॉर्पोरेशन कौन्सिलचे विरोधी पक्षनेते नवीन डिसोझा यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास विरोध केल्याचे कारण सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असताना शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू आहे. बेळगाव महाराष्ट्रात यावे, अशी महाराष्ट्राची मागणी आहे. या मागणीला कर्नाटकचा विरोध आहे. उलट सोलापूरसह अक्कलकोटचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.