ETV Bharat / bharat

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे राजकीय वादंग; हिंदुत्वाविरुध्द केले हे वक्तव्य..

‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ पुस्तकात सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केल्याने भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये सलमान खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

Salman khurshid
Salman khurshid
author img

By

Published : Nov 11, 2021, 7:26 PM IST

मुंबई - काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकावरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केल्याने भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये सलमान खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

  • A book comparing Hindutva to terror outfits ISIS &Boko Haram,is an attempt to demonise Hindu religion that has only spoken of Vasudhaiva Kutumbakam.Half baked information can get you book publicity but unnecessary consequences of hurting sentiments of millions of Hindus.Shame. pic.twitter.com/adnsmZGw4L

    — Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) November 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हटले आहे पुस्तकात ?

सलमान खुर्शिद यांनी Sunrise Over Ayodhya : Nationhood in Our Times या पुस्तकात हिंदुत्वाविषयी टिप्पणी केली आहे. या पुस्तकाच्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची बोको हराम, आयसिसशी तुलना केली आहे. “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

  • Congress’s Salman Khurshid in his new book writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Biko Haram.

    What else can we expect from someone whose party coined the term Saffron terror just to draw equivalence with Islamic jihad, to get Muslim votes? pic.twitter.com/3OikNQJ3qt

    — Amit Malviya (@amitmalviya) November 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुस्तकावरून भाजपने साधला निशाणा

या मुद्द्यावरून भाजपाकडून खुर्शिद यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालविय यांनी यासंदर्भात ट्वीट करून खुर्शिद यांना लक्ष्य केलं आहे. “काँग्रेसचे सलमान खुर्शिद त्यांच्या नवीन पुस्तकात म्हणतात हिंदुत्व हे आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांसारखं आहे. ज्यांनी मुस्लिम मतं मिळवण्याकरता भगवा दहशतवाद नावाच्या कल्पनेचा वापर केला, अशा पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा ठेवता येऊ शकते?” असा सवाल मालवीय यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

  • Hello Mr @salman7khurshid why are you trying to trigger communal riots when we all can live peacefully. Shame on such a thinking. Shame on comparing Hindus with terrorism rather its people like you who are the actual anti social elements & terr0rist #SalmanKhurshid Shameless !!! pic.twitter.com/1sKJ6ZTSJl

    — Dr. Vishal Garg (@DrVishalGarg3) November 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार दाखल

सलमान खुर्शिद यांच्याविरोधात दिल्लीस्थित वकील विवेक गर्ग यांनी ही तक्रार दाखल केली आहे. “हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी करून खुर्शिद यांनी हिंदुत्वाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - gujarat drug case : गुजरातमध्ये 350 कोटींचे ड्रग्ज जप्त, पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.