हैदराबाद - व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून 36 रुपयांची ( Commercial LPG gas cylinder price cut ) कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे 19 किलो सिलिंडरची ( LPG gas cylinder price cut ) किंमत 2 हजार 12 रुपये 50 पैशांऐवजी 1 हजार 976 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळणार, मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आली नसल्याने नागरिकांवरील महागाईची बोजा सध्या कायम असणार आहे.
हेही वाचा - Petrol Diesel Rate Today : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर
यापूर्वी 1 जुलैला किंमतीत घट - यापूर्वी 1 जुलैला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली होती. 198 रुपयांची कपात करण्यात आली होती. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2 हजार 21 रुपये इतकी झाली होती. त्यापूर्वी 2 हजार 219 रुपये किंमत होती. या कपातीमुळे काही प्रमाणात व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.
घरगुती सिलिंडरच्या दरांमध्ये कपात नाहीच - महागाई वाढली असून केवळ पेट्रोल, डिझेलच नव्हे तर गॅसच्या दरही वाढले आहेत. महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. अशात सरकार काही कपाती करून दिलासा देतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, ते काही होताना दिसत नाही आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर अद्याप जैसे थेच आहे. त्यात कुठलीही घट झालेली नाही. मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले होते. तेव्हा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दर 1 हजार पार गेले होते ते अद्यापही तसेच आहेत. त्यावर राजकीय पक्षांनी आंदोलने देखील केली आहेत. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सरकार कपात करेल का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा - BitCoin Rate In India : बिटकॉईनचे दर किती आहेत, जाणून घ्या