नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 198 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2021 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी त्यांची किंमत 2219 रुपये होती.
किमतीतील बदलानंतर दिल्लीत इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, इतर मोठ्या शहरांतील लोकांना तुलनेने कमी दिलासा मिळाला आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत १८२ रुपयांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 190.50 रुपयांनी कमी झाली आहे.
चेन्नईमध्ये त्यांच्या किमती १८७ रुपयांनी कमी झाल्या आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल १९ मे रोजी करण्यात आला होता.