ETV Bharat / bharat

Coal Scam 2012 in Maharashtra : महाराष्ट्रातील कोळसा खाण वाटप प्रकरण; माजी कोळसा सचिव एचसी गुप्तांना तीन वर्षांची शिक्षा - माजी सहसचिव केएस क्रोफा

महाराष्ट्र कोळसा खाण वाटप प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने ( Rouse Avenue Court ) माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता ( Former Coal Secretary HC Gupta ) यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दुसरीकडे माजी सहसचिव केएस क्रोफा यांना दोन वर्षांची तर ग्रेस इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश गुप्ता यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Coal Scam 2012 in Maharashtra
Coal Scam 2012 in Maharashtra
author img

By

Published : Aug 9, 2022, 12:24 PM IST

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 2012 मधील कोळसा खाण वाटप प्रकरणात दोषी ठरलेल्या माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने माजी सहसचिव केएस क्रोफा यांना दोन वर्षांची तर ग्रेस इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश गुप्ता यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी हा निकाल दिला.

माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना दिली शिक्षा : 4 ऑगस्ट रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शिक्षेच्या कालावधीबाबत निर्णय राखून ठेवला होता. 29 जुलै रोजी न्यायालयाने एचसी गुप्ता आणि माजी सहसचिव केएस क्रोफा यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते. 197 पानांच्या निकालात न्यायालयाने म्हटले होते की, एचसी गुप्ता यांनी माजी पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांशी झालेल्या तीन बैठकांमध्ये त्यांना महाराष्ट्राच्या लोहारा पूर्व कोळसा खाणीच्या वाटपाबाबत खोटी माहिती दिली.

केंद्र सरकारची फसवणूक केल्याचा आरोप : या प्रकरणी सीबीआयने २० सप्टेंबर २०१२ रोजी गुन्हा दाखल केला होता. चारही दोषींवर कोळसा मंत्री आणि केंद्र सरकारची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप होता. लोहारा पूर्व कोळसा खाणीचे वाटप ग्रेस इंडस्ट्रीजला मिळवून देण्यासाठी या गुन्हेगारांनी कट रचला आणि मदत केली. दोषींनी ग्रेस इंडस्ट्रीजच्या एकूण मालमत्तेची खोटी माहिती दिली.

तीन प्रकरणात ठरवले दोषी : याआधीही एचसी गुप्ता यांना कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या तीन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. 16 डिसेंबर 2020 रोजी, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने झारखंडमधील कोळसा खाण वाटप प्रकरणात एचसी गुप्ता यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 5 डिसेंबर 2018 रोजी, एचसी गुप्ता यांना पश्चिम बंगालच्या मोइरा आणि मधुजोर कोळसा खाणींच्या वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. 16 डिसेंबर 2017 रोजी, एचसी गुप्ता यांना झारखंडमधील राजहरा कोएल ब्लॉक वाटप प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.

हेही वाचा : Vinayak Raut on Shinde Government : शिंदे गटाचे बारा आमदार आमच्या संपर्कात - शिवसेना नेते विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.