भोपाळ- बालाघाट जिल्ह्यातील लांजी नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी देवेंद्र मर्सकोले हे बेजबाबदार वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातवेईकांना अपशब्द बोलून मारहाण करणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुंडागर्दीच असल्याचे म्हटले जात आहे.
लांजीमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह डॉक्टरांकडे मागितला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या लांजा नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी देवेंद्र मर्सकोले यांनी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना पोलिसांच्या समोरच मारहाण केली आहे. यावेळी कोणीतरी त्यांचा मोबाईलवरून व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही मर्सकोले यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण आणि प्रशासनात चांगलेच वजन असल्याचे दिसत आहे. उलट मारहाण झालेल्या तरुणालाच दोषी ठरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.
हेही वाचा-नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या
दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृतदेह हातगाड्यावरून मृतदेह न्यावा लागला आहे.
सीएमओ देवेंद्र मर्सकोले यांच्यावर झाले होते भ्रष्टाचाराचे आरोप
सीएमओ देवेंद्र मर्सकोले यांनी रुग्णांच्या नातेवाईकाला केलेली मारहाण ही अमानवी कृत्य असल्याची टीका स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. मर्सकोले यांच्यावर कारवाई करा, अशी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. वर्ष २०२२ मध्ये नगरपरिषद शहपुरा येथे प्रभारी सीएमओ असातना देवेंद्र मार्सकोले यांच्यावर २ लाख ७१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कोरोनाच्या काळात गरिबांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्य वितरणात घोटाळा झाल्याचाही आरोप आहे. सीएमओ देवेंद्र मर्सकोले यांची कामाची पद्धत, अनियमितता आणि शिक्षणाबाबत चौकशी करावी, अशी मागणी काही लोकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
हेही वाचा-18 ते 44 वयोगटाकरिता लसीकरण नोंदणी; सायंकाळी चारनंतर होणार सुरू